तिसरीतील विद्यार्थ्याला कोंबडा बनवून, पाठीवर बसला शिक्षक,; मुलाचा पाय फ्रॅक्चर
एका खाजगी शाळेतील प्रकार उघडतीस ....

तिसरीतील विद्यार्थ्याला कोंबडा बनवून, पाठीवर बसला शिक्षक,; मुलाचा पाय फ्रॅक्चर !
एका खाजगी शाळेतील प्रकार उघडतीस ….मुलाला
दिनांक 24/2/2025.
उत्तर प्रदेश ,
उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातील एका खासगी शाळेतील शिक्षकावर तिसरीतील विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. वर्गात शिकवत असताना शिक्षकाने १० वर्षांच्या विद्यार्थ्याला एक प्रश्न विचारल्याचं सांगण्यात येत आहे. प्रश्नाचं उत्तर न दिल्याबद्दल शिक्षकाने विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली आणि त्याला वर्गात ‘कोंबडा’ बनवलं.
मुलाला ‘कोंबडा’ केल्यानंतर शिक्षक त्याच्यावर बसले, ज्यामुळे मुलाचा तोल गेला आणि तो खाली पडला आणि त्याचा पाय फ्रॅक्चर झाला. त्याला ऐकू येणंही बंद झालं आहे. मुलाच्या आईने शिक्षकाच्या या कृत्याबद्दल तक्रार केली तेव्हा त्यांनी मुलाच्या उपचारासाठी २०० रुपये देण्यास सुरुवात केली. सध्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी शिक्षकाला अटक केली आहे.