
येनापुर येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती थाटात साजरी…
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
दिनांक :- 03 जाने.2024.
येनापुर :-
येनापुर येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती थाटात साजरी*
सावित्रीबाई जोतीराव फुले या एक भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्री होत्या. त्यांना भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखले जाते. आपले पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
सावित्रीबाईंना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते.अशा या थोर समाजसुधारक, स्त्री शिक्षणाच्या प्रेरनेत्या सावित्रीबाई फुले यांची 193 वी जयंती थाटात साजरी करण्यात आली.
दिनांक 03 जानेवारी 2024 रोज बुधवार ला संकल्प महिला ग्रामसंघ येनापुर यांच्या वतीने 193 वी सावित्रीबाई महात्मा फुले यांची जयंती पंचशील बौध्द विहार (किस्टापुर टोला) येनापुर येथे थाटात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर लहान बालकांचे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. त्यानंतर केक कापून थाटात त्यांची जयंती सांजरी करण्यात आली. महिलांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याविषयी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन रुपालीताई निखाडे सदस्य ग्रामपंचायत सोमनपल्ली, प्रमुख अतिथी म्हणून अमला बर्लावार सदस्य ग्रामपंचायत अड्याळ, अरुणा ताटकलवार अध्यक्ष संकल्प महिला ग्रामसंघ येणापुर, वर्षा येलकुचेवार ग्रामसंघ कोषाध्यक्ष, सूनिताताई बंडावार अध्यक्षा जनहित ग्रामीण विकास बहुउद्देशिय संस्था येणापुर, चंदा गोपवार पशूसखी, आम्रपाली झाडे बँक सखी, स्नेहल येअरपलीवार गटप्रवर्तक, मंजुषा येडलावार, शितल अवथरे ग्रा. सदस्य सोमनपल्ली, मीराबाई राऊत, मनीषा राऊत, माधुरी बंडावार,निर्मला गड्डलवार, वंदना संगावार, वंदना रामटेके, दीक्षा उमरे, अनिता येगलोपवार, ताईबाई खिरवटकर, रेखाबाई बंडावार, ज्योत्स्ना कुरेकार, कमलाबाई गेडाम, गयाबाई उमरे, बहुसंख्य महिला उपस्थित होते.