
तोहोगाव फाट्यावर अज्ञात ट्रकच्या धडकेत चितळ झाला ठार
उपसंपादक –
स्वप्निल मेश्राम.
चंद्रपूर:- ( तोहोगाव) .
कोठारी :- जवळील कुळेसावली – तोहोगाव फाट्यावर अज्ञात ट्रकच्या धडकेत चितळाचा मृत्यू झाल्याची घटना दि.२४ जुन शनिवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. वनविकास महामंडळाच्या झरण (गणपुर) वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक १ मध्ये राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला तोहोगाव फाट्याजवळ अज्ञात वाहनाने चितळाला जब्बर धडक दिली. या धडकेत चितळाचा जागीच मृत्यू झाला.
याबाबत वनाधिकारी एस. डी. मडावी यांना माहिती मिळताच वनाधिकारी कर्मचाऱ्यांसह ताबडतोब घटनास्थळी हजर झाले. मृतक चितळाला ताब्यात घेऊन पंचनामा करण्यात आला. यावेळी वनाधिकारी एस.डी.मडावी, परमेश्वर कर्णेवाड व आदी वनकर्मचारी उपस्थित होते. कोठारी – झरण ( कन्हाळगाव ) अभयारण्य जंगल परिसर असुन या परिसरात अनेक वन्यप्राणी आहेत व अनेकदा या मार्गावर अशा अपघातात वन्यप्राणी मृत्युमुखी पडत आहेत. या मार्गावरील वाहनांचा वेग हा अमर्यादित असतो व या पुर्वी सुध्दा अनेकदा अपघात झाले आहेत. तरी या वाहनांच्या वेगावर नियंत्रण करणे गरजेचे आहे. या महामार्गावरील भरधाव वाहनांमुळे वन्यप्राण्यांना जिवास धोका निर्माण झाला असुन जीव गमवावा लागत आहे. तसेच येथील वन्यप्राणी असुरक्षित झाले असुन यावर उपाययोजना वाव्ही अशी मागणी वण्यप्रेमी करीत.