
दुचाकी व सायकलचा भिषण अपघात
दुचाकी वरील एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर आणि सायकलस्वार गंभीर जखमी
चंद्रपूर :
पोंभुर्णा:-
पोभुर्णा येथून सायंकाळच्या सुमारास कामकाज आटपून दुचाकीने सातारा तुकूम कडे येत असताना दुचाकी व सायकलच्या धडकेत दोन जण गंभीर जखमी तर एक जण जागीच ठार झाल्याची घटना ५ मार्च मंगळवार ला रात्रौ ७:३० वाजताच्या सुमारास चेक हत्तीबोडी रोडवर घटना घडली. पोंभुर्ण्याकडून दशरथ सोनटक्के व निखिल आलाम दुचाकीने येत होते आणि सायकल स्वार रवींद्र बुरांडे हे कोबीचे कॅरेट सायकलवर मांडून हत्ती बोडी गावाकडे जात होता.
हतीबोडी कडे मागुन येणाऱ्या दुचाकी क्र.MH 34 W 8424 ने सायकल स्वारास धडक दिली त्यात सायकल स्वार रविंद्र बुरांडे वय ६५ रा. चक हतिबोडी येथील असुन गंभीर जखमी आहे. तर दुचाकीवरील मागे बसलेला निखिल आलाम वय २९ रा. सातारा तुकुम येथील असुन हा सुद्धा गंभीर जखमी असुन पोंभूर्णा ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहे. मृतकाचे नाव दशरथ सोनटक्के वय ३२ रा. सातारा तुकुम येथील आहे. कुटुंबात आई-वडील, पत्नी, आणि एक मुलगा आहे. पुढील तपास पोंभूर्णा पोलीस करीत आहेत.