मेडिकल मध्ये औषध घेत असताना , चक्कर येऊन खाली पडल्याने विद्याथीँनीचा जागीच मुत्यु.
मुख्य संपादक

मेडिकल मध्ये औषध घेत असताना , चक्कर येऊन खाली पडल्याने विद्याथीँनीचा जागीच मुत्यु.
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
दि.12जाने. 24
बल्लारपुर :- मेडिकल स्टोअरमध्ये औषधी घेत असताना अचानक चक्कर येऊन खाली पडली त्यामुळे विद्याथीँनिचा जागीच मृत्यू झाल्याची दुदैवी घटना आज दि.12 जानेवारी 8 वाजताच्या सुमारास घडली .
विद्याथीँनीचे नाव नंदिनी ऊर्फ गुणगुण प्रकाश कैथवास ( 16) वय वर्ष असुन संतोषी माता वाडँ बल्लारपुर येथील रहिवासी असुन प्रकूती ठिक नसल्यामुळे आपल्या वडिलांनसोबत दवाखान्यात गेली होती.व औषधी घेत असताना तिला चक्कर आल्याने खाली पडली व तिच्या डोक्याला गुप्त मार लागल्याने तीचा जागीच अंत झाला.
नंदिनी प्रकाश कैदवास हि सेंट पाँल नसिँग काँलेज मघ्ये शिकत होती तसेच तिच्या काँलेज मघ्ये काल कार्यक्रम होता .आणि ती कार्यक्रम करून आल्यावर तिला अस्वास्थ वाटत असल्याचे सांगितले .