
येनापुर येथे संविधान दिन साजरा…..
दणका कायद्याचा डिजिटल न्युज .
प्रतिनिधी येनापुर :- आकाश बंडावार
येनापुर :-
आज दिनांक २६ नोव्हेंबर २०२३ ला येनापुर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौवका मध्ये ७४ वा संविधान दिवस साजरा करन्यात आला.
चौकातील मुख्य अशा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून मालार्पन करन्यात आले. त्यानंतर सामुहिक प्रास्ताविक वाचन करन्यात आले.
कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून मा. विजय मेश्राम सर, मा. शेडमाके सर, मा. वासुदेव गोंगले सर, ॲड. दिनेश राऊत यांनी संविधानाच्या संपूर्ण घटकांवर प्रकाश टाकून संविधानाचे महत्त्व समजावून सांगितले. तसेच संविधानाचे मार्गदर्शक तत्वे, मुल्ये, मुलभूत कर्तव्य सांगतांना संविधान लिहित असतांना बाबासाहेबांना किती कष्ट घेतले. या बाबत सविस्तर वर्णन करन्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. निकेशभाऊ गद्देवार. मा. बंडावार. तसेच सिद्धार्थ बौद्ध समाज मंडळाचे अध्यक्ष मा. जैसुक गेडाम. पंचशील बौद्ध समाज मंडळाचे अध्यक्ष मा. प्रमोद उमरे. तसेच समाजाचे संपुर्ण पदाधिकारी व बौद्ध उपासक तथा उपासिका उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंकुश निमसरकार संचलन राकेश कुरखेडे व आभार प्रदर्शन अनुराग गोंगले यांनी केले. व कार्यक्रम पुर्ण करण्यासाठी समाजातील युवा मंडळी यांनी मोलाचे सहकार्य केले.