देशबंधु चित्तरंजनदास हिंदी महाविद्यालयाचा निकाल उत्कृष्ट; महाविद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम …
मुख्य संपादक

देशबंधु चित्तरंजनदास हिंदी महाविद्यालयाचा निकाल उत्कृष्ट ; येनापुर महाविद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम ..
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
दि.28/5/24
गडचिरोली
येनापुर ,
वनवैभव शिक्षण संस्था अहेरी द्वारा संचालित देशबंधु चित्तरंजनदास हिंदी हायस्कूल तथा कनिष्ठ कला महाविद्यालय,येनापूर ता.चामोर्शि जि.गडचिरोली येथे एच.एस.सी.व एस.एस.सी.मार्च 2024 चा निकाल नुकताच जाहिर झाला असून देशबंधु चित्तरंजनदास हिंदी हायस्कूल तथा कनिष्ठ कला महाविद्यालय ने आपली उज्वल यशाची परंपरा कायम राखली असुन कनिष्ठ कला महाविद्यालयाचा निकाल 97.56% लागलेला आहे. यामध्ये विद्यालयाची कु.चंदना राकेश मंडल या विद्यार्थीनीने 76.17% गुण तसेच कु.सरीता प्रशांत मंडल हिने 76.17% गुण मिळवून प्रथम येण्याचा बहुमान मिळविला. कु.मालविका संजीत बहादुर हिने 75.83% गुण मिळवुन द्वितीय क्रमांक पटकाविला.कु.प्रेरना संजित मंडल हिने 75.67% गुण मिळवुन तृतीय क्रमांक पटकाविला तर रोहित रमेश केशनवार याने 74.17% गुण मिळवुन चतुर्थ क्रमांक पटकाविला. यानंतर एस.एस.सी.परीक्षेत विद्यालयाचा 97.61% निकाल लागला.यात प्रेम पंचानन मंडल या विद्यार्थ्यांने 93.80% परीक्षा केंद्रात तसेच विद्यालयात प्रथम येण्याचा बहुमान पटकाविला.देवदुती देवाशिष बॕनर्जी याने 85.40% गुण मिळवुन द्वितीय क्रमांक पटकाविला.कु.रोशनी राकेश राॕय हिने 80% गुण मिळवुन तृतीय क्रमांक पटकाविला.निरब जयदेव सरकार याने 74.60% गुण मिळवुन चतुर्थ क्रमांक पटकाविला.कु.पायल परीतोष सरकार हिने 74.40% गुण मिळवुन व कु.तनिषा रतन मंडल हिने 74.40 गुण मिळवुन पाचवे स्थान पटकाविले.
शुभजित संजित बहादुर याने 74%गुण मिळवुन सहावे स्थान पटकाविले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे उपाध्यक्ष श्री.मा.बबलु भैय्या जी हकीम साहेब,श्री.संजय नागपूरे सर (प्राचार्य),प्राध्यापक गण,सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी अभिनंदन केले आहे.
तसेच आज देशबंधु चित्तरंजनदास हिंदी हाँयस्कुल तथा कनिष्ठ महाविद्यालय येनापुर येथील प्राचार्य श्री. संजय नागापुरे सर याना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा , प्राध्यापक गण,सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी अभिनंदन केले आहे.
सौ.सोनिया संजय नागपुरे यांच्या कडुन वाढदिवसाच्या सुभेच्छा
तसेच त्यांच्या परीवाराकडुन सुद्धा वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.