साखरा जिल्हा परिषद शाळेसमोर गतिरोधक तयार करण्याची उपसरपंच अर्चनाताई बोरकुटे यांची मागणी ।
मुख्य संपादक:- संतोष मेश्राम

साखरा जिल्हा परिषद शाळेसमोर गतिरोधक तयार करण्याची उपसरपंच अर्चनाताई बोरकुटे यांची मागणी ।
ग्रामपंचायत साखरा येथील उपसरपंच सौ. अर्चनाताई बोरकुटे यांची मागणी ।
गडचिरोली
दिनांक 23/7/24.
मा. राज्य बाल हक्क आयोग मुंबई, मा. जिल्हाधिकारी गडचिरोली, मा. मुख्यकार्यकारी अधिकारी गडचिरोली तथा मा. जिल्हा शिक्षणाधिकारी ( माध्य )जिल्हा परिषद गडचिरोली यांना दिले निवेदन आहे.
गडचिरोली तालुक्यातील साखरा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गडचिरोली ते नागपूर राज्य महामार्ग ( 353 ) ला अगदी 20 मिटर वरती असून सदर शाळेत गावातील बालके 1ते 7 वर्गपर्यंत शिक्षण घेण्यासाठी जातात साखरा हे गाव राज्य महामार्गच्या दोन्ही बाजूनी विभागले असल्यामुळे बालकांना शाळेत रोड ओलांडून यावे लागते व सदर रस्त्यावर वाहने ही भरधाव वेगाने जात असल्यामुळे बालकांना रस्त्या ओलांडताना अडचणी येतात तसेच त्या मार्गांवर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने सदर प्रकरणाचे अनुषंगाने सन 2019 मध्ये गडचिरोली येथे जिल्हा प्रशासन गडचिरोली तथा राष्ट्रीय बाल हक्क आयोग दिल्ली यांनी घेतलेल्या जनसूनवाई मध्ये जिल्हा परिषद शाळेसमोर गतिरोधक तयार करण्यासाठी निवेदन देण्यात आले .
आयोगाने संबंधित विभागाचे विभाग प्रमुख यांना सदर प्रकरणात तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश सुद्धा दिले परंतु आजता गायत त्या विभागाणे अद्याप ही शाळेसमोर गतिरोधक तयार न केल्यामुळे सौ अर्चना बोरकुटे यांनी गतीरोधक तयार होण्यासाठी मा. अध्यक्ष राज्य बाल हक्क आयोग मुंबई मा. जिल्हाधिकारी गडचिरोली मा. मुख्यकार्यकारी अधिकारी गडचिरोली यांना निवेदन दिले त्यात राज्य बाल हक्क आयोगाने निवेदनाची दखल घेऊन मुख्यकार्यकारी अधिकारी विभागीय परिवहन अधिकारी तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांना 7 दिवसाचे आत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेले आहेत .