Breaking
आरोग्य व शिक्षणगडचिरोली

गोंडवाना विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे सेट-2024 परीक्षेत सुयश भौतिकशास्त्र विभागाचा मयुर अंबोरकर तर संगणकशास्त्र विभागाचा रोहित कुंभारे सेट परीक्षा उत्तीर्ण। 

मुख्य संपादक:- संतोष मेश्राम

 

 

गोंडवाना विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे सेट-2024 परीक्षेचे सुयश ,भौतिकशास्त्र विभागाचा मयुर अंबोरकर तर संगणकशास्त्र विभागाचा रोहित कुंभारे सेट परीक्षा उत्तीर्ण। 

 

दणका कायद्याचा डिजिटल न्युज

गडचिरोली

, दि. 9:8:24.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाद्वारे घेण्यात आलेल्या सहाय्यक प्राध्यापक पदासाठीच्या पात्रता परीक्षेचा (सेट) निकाल जाहीर करण्यात आला. या परीक्षेमध्ये गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथील पदव्युत्तर शैक्षणिक भौतिकशास्त्र विभागातील विद्यार्थी मयुर लिलाधर अंबोरकर याने भौतिकशास्त्र विषयातील सेट-2024 परीक्षा उत्तीर्ण केली आहे. तसेच गोंडवाना विद्यापीठातील एम.एससी. संगणकशास्त्र विभागाचा माजी विद्यार्थी रोहित कुंभारे या विद्यार्थ्याने संगणकशास्त्र विषयातील सेट-2024 परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

या यशाबद्दल गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन यांनी मयुर अंबोरकर व रोहित कुभांरे या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करीत कौतुक केले.

विशेष म्हणजे, LearnQuach चे संचालक मनिष तिवारी यांनी संगणकशास्त्र विभागाचा विद्यार्थी रोहित कुंभारे यास रु. 30 हजार मासिक वेतनावर कार्य करण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे.

परीक्षेमध्ये यश प्राप्त करण्यासाठी भौतिकशास्त्र विभागातील प्रा. विकास पुनसे, डॉ. प्रितेश जाधव, डॉ. अपर्णा भाके, डॉ. नंदकिशोर मेश्राम यांचे मार्गदर्शन लाभले. तर संगणकशास्त्र विभागातील तंत्रज्ञान विषयाचे अधिव्याख्याता डॉ. अनिल चिताडे, संगणकशास्त्र विषयाचे समन्वयक संदीप कागे, संगणकशास्त्र विषयाचे प्राध्यापक मेघराज जोगी, डॉ. कृष्णा कारु, डॉ. मनिष देशपांडे, विकास चित्ते आदींचे मार्गदर्शन लाभले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे