राजकिय
खासदार डॉ. किरसान यांनी दिल्ली येथे केंद्रीय दुरसंचार मंत्री ज्योतीरादित्य सिंदिया यांची भेट घेऊन गडचिरोली- चिमुर लोकसभा क्षेत्रातील मोबाईल व इंटरनेट कनेक्टिव्हिटी प्रभावी करण्याची केली मागणी ।
संपादक स्वप्नील मेश्राम

खासदार डॉ. किरसान यांनी दिल्ली येथे केंद्रीय दुरसंचार मंत्री ज्योतीरादित्य सिंदिया यांची भेट घेऊन गडचिरोली- चिमुर लोकसभा क्षेत्रातील मोबाईल व इंटरनेट कनेक्टिव्हिटी प्रभावी करण्याची केली मागणी ।
दिनांक 9/8/24.
दणका कायद्याचा डिजिटल न्यू ज
गडचिरोली .
यावेळी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे सोबत होते. बऱ्याच ठिकाणी मोबाईल व इंटरनेट नेटवर्क उपलब्ध नसल्यामुळे ऑनलाईन करण्यात अनेकांना अडचणी येतात. तसेच संपर्क साधता येत नाही. राशन दुकानात इंटरनेट नसल्यामुळे लोकांना राशन मिळत नाही. त्यामुळे मोबाईल व इंटरनेट कनेक्टिव्हिटी सुरळीत करण्याची मागणी मंत्री महोदयांकंडे केली.