कवीयत्री संगीता रामटेके यांच्या प्रतिष्ठानाला खेमदेव हस्तेनी दिली भेट.
मुख्य संपादक:- संतोष मेश्राम .

कवीयत्री संगीता रामटेके यांच्या प्रतिष्ठानाला खेमदेव हस्तेनी दिली भेट.
गडचिरोली( दि.३ सप्टेंबर)
दणका कायद्याचा डिजिटल न्युज.
कार्यकारी संपादक
अनुप मेश्राम.
आरमोरी ब्रम्हपुरी मार्गावर वास्तव्य करीत असलेल्या.सामाजिक, व साहित्य श्रेत्रात नावलौकिक पावलेल्या सामाजिक कार्यकर्त्या व लोकप्रिय कवियत्री संगीता रामटेके यांनी साहित्य क्षेत्रात पावूल टाकून.फार मोठी क्रांती केलेली आहे. त्यानी आतापर्यंत केलेली काव्यरचना हृदयातील भाव, काव्यसंगीता,वेदनेचे काहूर आतापर्यंत प्रकाशित झालेले अनेक काव्यसंग्रह माणसाला, घडविणारी, समाजाला नवी नवी दिशा देणारी, परिवर्तना कडे घेवून जाणारी व अनेकांच्या आंतरिक मनाला वेधणारे असून त्याचे काव्यसंग्र अनेक वृत्तपत्रातून. प्रकाशित झालेले असून. त्या अनेक पुरस्कारांच्या धनी सुध्दा ठरलेल्या आहेत वाचकांच्या संख्येत व बाजारपेठेत त्यांच्या काव्यसंग्रहाला बहुमूल्य प्राप्त झालेले आहेत.
गडचिरोली माळ्या तुकम परिसरातील नवोदय साहित्यिक खेमदेव हस्ते यांनी त्यांच्या अनेक काव्य संग्राहवर समीक्षा सुध्दा केलेली आहे.
खेमदेव हस्ते या नवोदित साहितिकानी नुकत्याच त्यांच्या प्रतिष्ठानाला भेट देऊन मुख कठाने त्यांच्या प्रकाशित काव्य सग्रहाची प्रशासा सुध्दा केलेली आहे.
संगीता रामटेके यांनी सुध्दा खेमदेव हस्ते व पत्रकार अनुप मेश्राम यांचें मनपूर्वक स्वागत करून.आपले प्रकाशीत काव्य संग्रह त्यांच्या हातात देवून त्यांचे अभिंनदन सुध्दा केलेले आहे.