शाळांना सुट्टी देण्यावरून गोंधळ; शिक्षण विभागाने आणखी एक परिपत्रक काढले…
मुख्य संपादक:- संतोष मेश्राम

शाळांना सुट्टी देण्यावरून गोंधळ; शिक्षण विभागाने आणखी एक परिपत्रक काढले…
दणका कायद्याचा डिजिटल न्युज.
दिनांक 18/11/2024.
ज्या शाळांमधील सर्व शिक्षकांची नियुक्ती निवडणूक कामकाजासाठी झाली आहे, त्या शाळेच्या नजीकच्या शाळेतील ज्या शिक्षकांची नियुक्ती निवडणूक कामकाजासाठी झालेली नाही, त्यांच्या मदतीने १८ व १९ नोव्हेंबर २०२४ रोजी शाळा सुरू ठेवण्यात याव्यात,अशा सुधारित सूचना देण्यात येत आहेत.
विधानसभा निवडणूकीनिमित्त शाळांना सुट्टी देण्यासंदर्भात (Holidays for schools on the occasion of assembly elections) राज्य शासनाच्या उपसचिवांनी व शिक्षण आयुक्तांनी प्रसिध्द केलेल्या पत्रकामुळे काही प्रमाणात संभ्रम दूर झाला होता.मात्र,कोणत्या शाळा सुरू ठेवाव्यात या संदर्भात शिक्षण आयुक्त सूरज मांढरे (Education Commissioner Suraj Mandre) यांनी आणखी एक परिपत्रक (Circular) प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार ज्या शाळांमधील सर्व शिक्षकांची नियुक्ती निवडणूक कामकाजासाठी झाली आहे, त्या शाळेच्या नजीकच्या शाळेतील ज्या शिक्षकांची नियुक्ती निवडणूक कामकाजासाठी झाली नाही, त्यांच्या मदतीने १८ व १९ नोव्हेंबर २०२४ रोजी शाळा सुरू ठेवण्यात याव्यात,अशा सुधारित सूचना देण्यात येत आहेत.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षण आयुक्तालयाने पत्रक प्रसिध्द केले होते. त्यात ज्या शाळेतील सर्व शिक्षकांची नियुक्ती निवडणूक कामकाजासाठी झाली आहे. त्या शाळा १८ नोव्हेंबर २०२४ व दिनांक १९ नोव्हेंबर २०२४ रोजी बंद ठेवणे संदर्भात संबंधित मुख्याध्यापक यांनी त्यांचे स्तरावरून निर्णय घेण्यात यावा,अशा सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामध्ये अंशतः सुधारणा करण्यात येत असून ज्या शाळांमधील सर्व शिक्षकांची नियुक्ती निवडणूक कामकाजासाठी झाली आहे. त्या शाळेच्या नजीकच्या इतर शाळेतील ज्या शिक्षकांची नियुक्ती निवडणूक कामकाजासाठी झालेली नाही, त्यांच्या मदतीने १८ नोव्हेंबर २०२४ व १९ नोव्हेंबर २०२४ रोजी शाळा सुरू ठेवण्यात याव्यात, अशा सुधारित सूचना देण्यात येत आहेत.
राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळा या १८ नोव्हेंबर २०२४ व १९ नोव्हेंबर २०२४ रोजी सुरू राहतील. याचे संपूर्ण नियोजन संबंधित गटशिक्षणाधिकारी यांनी संबंधित मुख्याध्यापकांच्या मदतीने करावे. १८ व १९ नोव्हेंबर २०२४ रोजी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळा सुरु राहतील याची संपूर्ण जबाबदारी संबंधित गटशिक्षणाधिकारी यांची राहील,असे पत्र आता शिक्षण आयुक्त कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे.