लोहखनिज घेऊन जाणाऱ्या सुरजागड ट्रकने ,उभा असलेल्या ट्रकला धडक,दिल्याने एक जागीच ठार…
मुख्य संपादक :- संतोष मेश्राम

लोहखनिज घेऊन जाणाऱ्या सुरजागड ट्रकने ,उभा असलेल्या ट्रकला धडक,दिल्याने एक जागीच ठार…
दिनांक 03/01/2025.
प्रतिनिधी ,आकाश बंडावार
चामोशीँ तालुक्यातील अनखोडा जवळ घडली घटणा …
लोहखनिज घेऊन जानाऱ्या ट्रकने समोरच्या ट्रकला जबरदस्त धडक दिल्याने चालक जागीच ठार झाल्याची घटना दि २ जानेवारी ला रात्री १० .३० वाजताच्या दरम्यान अनखोडा व उमरी जवळ घडली.
मृतक चालकाचे नाव मोहीत यादव वय २६ रा.कोइलरा मध्यप्रदेश असे असून तिन ट्रक मिळून स्टॉक यार्डमधून लोहखनिज घेऊन रायपूर कडे जाताना आष्टी पुढील अनखोडा व उमरी दरम्यान ट्रक क्रमांक एम एच ३४ बि झेड २३७७ हे ट्रक पुढे होते त्यापुढे जनावराचा कळप दिसल्यावर त्याने ब्रेक घेतला तेव्हा त्याच्या मागे येणारा ट्रक क्रमांक एम एच ३३ डब्ल्यू १९७७ त्याने धडक दिली मात्र ती सौम्य स्वरूपाची होती परंतू त्या मागे येणारा ट्रक क्रमांक जिएफसी ट्रान्सपोर्टचा एम एच ४० सी टी १२८५ या ट्रकने समोरच्या ट्रकला जबरदस्त धडक दिल्याने चालक जागीच ठार झाले.
सदर घटनेची माहिती मिळताच आष्टी पोलीसांनी लागलीच धाव घेतली व अपघातातील चालकाला आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.अधिक तपास पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करित आहेत