Breaking
आरोग्य व शिक्षणगडचिरोली

प्रशिक्षणच नव्हे,तर प्लेसमेंट पर्यंत विद्यार्थ्याचा पाठपुरावा !

अल्फा अकॅडमी संचालित स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम चा निरोप समारंभ...

 

प्रशिक्षणच नव्हे,तर प्लेसमेंट पर्यंत विद्यार्थ्याचा पाठपुरावा !

अल्फा अकॅडमी संचालित स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम चा निरोप समारंभ…

 

गडचिरोली, 

जिल्हा परिषद गडचिरोली व दिया चॅरिटेबल ट्रस्ट म्हैसूर यांच्या संयुक्त विद्यमाने डिस्ट्रिक्ट डीसएबिलिटी रेहाबिलिटेशन सेंटर,गडचिरोली च्या अंतर्गत दीव्यांग विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेला 30 दिवसीय कौशल्य विकास उपक्रमाचा निरोप समारंभ 9 जानेवारीला अल्फा अकॅडमी,गोंडवाना विद्यापीठ,गडचिरोली येथे उत्साहात पार पडला.

शारीरिक दृष्टीने कमकुवत किंवा दिव्यांग मुले मागे पडू नये ,त्यांनाही समाजाच्या मुख्य धारेत स्वतंत्रपणे वावरता यावे व ते रोजगारक्षम बनावे या उद्देशाने दिव्यांग मुलांकरिता 30 दिवसीय कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जातात याच संदर्भात एका तुकडीने आपले प्रशिक्षण पूर्ण केले व सर्वांचा निरोप घेतला.या प्रशिक्षण कार्यक्रमात दिव्यांग विद्यार्थांना युनिसेफ मार्फत प्रस्तावित नवीन तंत्रज्ञान संबंधी विषय जसे कृत्रिम बुद्धिमत्ता,फायनान्स इंटेलेजन्स,डिजिटल साक्षरता,कोडींग इत्यादी चे प्रशिक्षण दिल्या जातं.

सदर कार्यक्रमात डॉ.कृष्णा कारू (नोडल ऑफिसर,अल्फा अकॅडमी व प्राचार्य,आदर्श पदवी महाविद्यालय), मा.श्री.प्रमोद जावरेकर सर (प्राध्यापक,गोंडवाना विद्यापीठ), मा.श्री.अनंत पिंपळे सर( संचालक,अल्फा अकॅडमी) मा.श्री.अमर तेलंग सर(आयोजक), मा.नैना साखरकर (सह आयोजक), मा.राजश्री परिहार (प्राध्यापिका,आदर्श पदवी महाविद्यालय) इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

मार्गदर्शन करताना डॉ.कृष्णा कारू यांनी आजच्या पिढीला कौशल्य संपादन करण्याची किती गरज आहे हे सांगताना आदर्श पदवी महाविद्यालय, सीआयआयआयटी व अल्फा अकॅडमी चा विशेष संदर्भ दिला.ते म्हणाले की या तिन्ही घटकांमार्फत आम्ही नवीन तंत्रज्ञान संबंधी अभ्यासक्रम व प्रशिक्षण विद्यार्थांना देतो आणि फक्त प्रशिक्षनच नाही तर इंडस्ट्री मधे इंटर्नशिप व रोजगाराच्या संधी सुद्धा उपलब्ध करून दिल्या जातात.पुढे ते स्पष्ट करतात की आत्तापर्यंत 500 विद्यार्थी हे प्रशिक्षण पूर्ण करून गेले त्या पैकी 50 पेक्षा जास्त विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आहेत आणि नवीन बॅच मधे आणखी 500 विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत.मा.अनंत पिंपळे सरांनी आपल्या भाषणातून दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देताना काय समस्या येतात आणि त्या कश्या पद्धतीने सोडविल्या जातात यावर प्रकाश टाकला.सर्व मान्यवरांनी विद्यार्थांना प्रोत्साहन व शुभेच्छा दिल्या आणि सांगितले की ते दिव्यांग नसून विशेष आहेत.

कार्यक्रमाचे संचालन कु.मीनाक्षी टेंभुर्णे आणि आभार किशोर वैद्य यांनी केले.या वेळी अल्फा अकॅडमी चे सर्व विद्यार्थी व प्रशिक्षक मा.महेश तकारे, मा.हर्षदा गेडाम, मा.राणी विभोरे तसेच आदर्श पदवी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे