
प्रियसीची हत्या करुन 6 महिने फि्जमघ्ये ठेवला मुत्यदेह , नव्या भाडेकरुमुळे उघडकीस आला प्रकार …
मध्य प्रदेशातील देवास,
दि.11/01/25.
लिव्ह-इन रिलेशनशिपमधून आणखी एक भयानक हत्याकांड समोर आलं आहे. मध्य प्रदेशातील देवास येथील वृंदावन धाम कॉलनीतील एका घरात फ्रिजमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने घरातून उग्र वास येत असल्याची माहिती पोलिसांना दिली होती.
घटनेची माहिती मिळताच पोलीस ठाण्याने घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. गेल्या सहा महिन्यांपासून महिलेचा मृतदेह हा फ्रिजमध्ये बंद होता अशी माहिती समोर आली आहे. या प्रकरणी एका व्यक्तीला अटक देखील करण्यात आली आहे.