
भामरागड हादरले ! माजी पंचायत समितीच्या सभापतींची नक्षल्याकडून हत्या , मृत देहाजवळ टाकले पत्रक.
दिनांक 2/2/2025.
दणका कायद्याचा न्युज.
गडचिरोली / भामरागड ,
छत्तीसगड सीमेवरील पेनगुंडा व पाठोपाठ नेलगुंडा येथे पोलिस मदत केंद्र स्थापन केल्याने बिथरलेल्या नक्षल्यांनी कियेर (ता. भामरागड) येथील माजी पंचायत समिती सभापती सुखदेव मडावी (४५) यांची हत्या केली. २ फेब्रुवारीला सकाळी गावालगत मृतदेह आढळला. मृतदेहाजवळ नक्षल्यांनी एक पत्रक टाकले. त्यात मृत व्यक्तीने पेनगुंडा येथे पोलिस मदत केंद्र उघडण्यासाठी पोलिसांना मदत केल्याचा संशय व्यक्त केला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली.