शहरातील रस्त्यांवर बेवारस भटकंती करणाऱ्या मनोरुग्णांची शोधमोहीम !
मुख्य संपादक :- संतोष मेश्राम

शहरातील रस्त्यांवर बेवारस भटकंती करणाऱ्या मनोरुग्णांची शोधमोहीम !
दणका कायद्याचा डिजिटल न्युज .
मुख्यसंपादक
संतोष मेश्राम
गडचिरोली/ 23 .
शहरात रस्त्यावर बेवारस फिरणारे/भिक मागणारे असे बरेच मनोरुग्ण फिरताना दिसतात. अनेक समस्या असल्यामुळे आपण त्यांच्याजवळ जात नाही सर्व सामान्य नागरिकांना त्यांचा त्रास सहन करावा लागतो याची प्रशासनाने दखल घेऊन जील्हाविधी सेवा प्राधिकरण व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय गडचिरोली व पोलिस प्रशासन तसेच दिव्यवंदना आधार फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज २३ ऑक्टोबर २०२३ रोजी गडचिरोली शहरातील रस्त्यावर बेवारस भटकंती करुन भीक मागुन वेडा – पिसा मनोरुग्ण अशा वाईट अवस्थेत वावरत असलेल्या मनोरुग्णांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर उपचार करुन पुनर्वसन करण्याकरिता शोध मोहीम राबविण्यात आली आहे.
सदर शोध मोहीम अभियान जिल्हा विधी सेवा प्राधिकरनाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. श्री. यु. बी. शुल्क, प्राधिकरणाचे सदस्य सचिव मा. आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आली. सदर अभियान राबविताना विनोद पाटील,जिल्हा परिविक्षा अधिकारी महीला व बालविकास कार्यालय गडचिरोली तसेच पोलिस स्टेशन गडचिरोली येथील मेश्राम मजर व टिम, दिव्यवंदना आधार फाउंडेशन चे अध्यक्ष शुभम पसारकर, क्षेत्र कार्यकर्ता रवींद्र बंडावर, सुनील चौधरी, कांचन निकोडे, प्राची गजबिये, पोर्णीमा खोब्रागडे, अस्मिता सरपती या सर्वांनी मिळुन यशस्वीरीत्या ही शोध मोहीम राबविली.