Breaking
गडचिरोली

गडचिरोली पोलीस दलाच्या प्रोजेक्ट उडान अंतर्गत आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांकरीता विर बाबुराव शेडमाके सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन

उपमुख्य संपादक

 

गडचिरोली पोलीस दलाच्या प्रोजेक्ट उडान अंतर्गत आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांकरीता विर बाबुराव शेडमाके सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन

 

गडचिरोली जिल्ह्यातील १०६ आश्रम शाळेतील एकुण २३ हजार ३४५ विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

दणका कायद्याचा डिजिटल न्युज 

गडचिरोली   .

दि 25 जाने.2024

  गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश विद्यार्थी हे दुर्गम अतिदुर्गम भागात राहतात. त्यामुळे तेथील विद्यार्थांना योग्य मार्गदर्शन व संधीचा अभाव आहे. तसेच दुर्गम अतिदुर्गम भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षा बद्दल असलेल्या अज्ञानामुळे, त्यांना मिळत नसलेल्या योग्य मार्गदर्शनाच्या अभावामुळे विद्यार्थी हे स्पर्धा परिक्षेत मागे पडत आहेत. त्या करीता आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची व स्पर्धापरिक्षा विषयीची ओढ निर्माण व्हावी, त्यांची उज्वल भविष्याकडे वाटचाल व्हावी व त्यांचा स्पर्धा परिक्षेकडे कल वाढाया तसेच त्यांना स्पर्धा परिक्षेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाच्या प्रोजेक्ट उडान अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील आश्रम शाळेमधील विद्यार्थ्यांकरीता PRYAS (POLICE REACHING OUT TO YOUTH & STUDENTS) या उपक्रमांतर्गत जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधुन ०९ ऑगस्ट २०२३ पासून चिर बाबुराव शेडमाके सामान्य ज्ञान स्पर्धा सुरु करण्यात आली होती.

सदर स्पर्धा राबविण्याकरीता जिल्ह्यातील १०६ शासकिय व निमशासकिय आश्रम शाळेमधील ०१ समन्य शिक्षक व आश्रम शाळा ज्या पोस्टे/उपपोस्टे/पॉमके मधील ०१ समन्वय पोलीस अधिकारी व समन्वय पोलीस अंमलदार यांना PRYAS (सामान्य ज्ञान) वाट्सअप ग्रुप तयार करुन या ग्रुपमध्ये अॅड केले होते.

सदर स्पध्येमध्ये आश्रम शाळांना वाटस्अपव्दारे रोज १० प्रश्न पाठविण्यात येत होते. व आश्रम शाळेती समन्वय शिक्षक दैनंदिन परिपाठामध्ये विदयार्थ्यांना प्रश्न विचारुन त्यांची उत्तरे स्पष्टीकरणासह सांगत होते. अशा प्रकारे सदर उपक्रम ०६ महिणे चालविल्यानंतर आज २४ जानेवारी २०२४ रोजी विर बाबुराव शेडमाके सामान्य ज्ञान वार्षिक स्पर्धा परीक्षा गडचिरोली जिल्हगील १०६ आश्रम शाळेमधील २३३४५ विद्यार्थ्यांनी दिली.

सदर परीक्षेमध्ये गुणवत्तापूर्वक विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोस्टे/ उपपोस्टे/पोमकेचे सर्व प्रभारी अधिकारी व सर्व समन्वय अधिकारी, आश्रम शाळेतील सर्व मुख्याध्यापक व समन्वय शिक्षक तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि. धनंजय पाटील, पोउपनि भारत निकाळजे, पोउपनि चंद्रकांत शेळके, पोअं/रविंद्र कंकलवार व सर्व पोलीस अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे