देश-विदेश
रीलमध्ये धूर दाखवण्यासाठी रूम मध्ये एलपीजी गॅस सोडला ; लाईट चालू होताच स्फोटाने इमारत हादरली
मुख्य संपादक

रीलमध्ये धूर दाखवण्यासाठी रूम मध्ये एलपीजी गॅस सोडला ; लाईट चालू होताच स्फोटाने इमारत हादरली
मध्य प्रदेश ,
सध्या इन्स्टाग्रावर रिल्स बनवण्यासाठी लोक काहीही करतात. स्वत:चा जीव धोक्यातही घालतात, अशीच एक घटना मध्य प्रदेशमधून समोर आली आहे. ग्वाल्हेरमध्ये रील बनवण्यासाठी धूर दाखवावा लागला, त्यासाठी एलपीजी गॅस रुममध्ये सोडला. यानंतर, रुममधील लाईट चालू केली. अचानक एक मोठा स्फोट झाला. या स्फोटात एक महिला आणि एक पुरूष गंभीर भाजले. इमारतीचे नुकसान झाले. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.