देश-विदेश
इमारतीच्या डकमध्ये सापडल नवजात बाळ ; अंबरनाथ मधील धक्कादायक प्रकार
मुख्य संपादक :- संतोष मेश्राम .

इमारतीच्या डकमध्ये सापडल नवजात बाळ ; अंबरनाथ मधील धक्कादायक प्रकार
दणका कायद्याचा डिजिटल न्युज.
दिनांक 22/11/2024.
अंबरनाथ। ,
अंबरनाथमधून एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. अंबरनामध्ये एका स्त्री जातीच्या अर्भकाला इमारतीवरुन खाली फेकल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या अर्भकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून या प्रकरणी पोलिसांनी दोन महिलांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरु केली आहे. या घटनेमुळे इमारतीमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाची आता कसून चौकशी करत आहेत.