Breaking
आरोग्य व शिक्षण

गोंडवाना विद्यापीठाच्या प्रांगणात आंतरराष्ट्रीय योगदिन संपन्न

मुख्य संपादक :- संतोष मेश्राम

 

गोंडवाना विद्यापीठाच्या प्रांगणात आंतरराष्ट्रीय योगदिन संपन्न .

 

मुख्य संपादक :-

संतोष मेश्राम 

गडचिरोली :- 

आंतरराष्ट्रीय योगदिन गोंडवाना विद्यापीठाच्या प्रांगणात आज सकाळी ६ वाजता गोंडवाना विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग,राष्ट्रीय सेवा योजना, जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय ,आर्ट ऑफ लिविंग ,पतंजली योग परिवार, लॉयन्स क्लब, रोटरी क्लब , मनस्विनी मंच, सखी मंच नेहरू युवा केंद्र ,आधारविषव फाउंडेशन ,रोटरी क्लब , लॉयन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य स्वरूपात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्ह्याक्रीडा अधिकारी प्रशांत दोंदल, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन, रासेयो संचालक डॉ. श्याम खंडारे , कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या पत्नी विद्या बोकारे , संचालक शारीरिक व क्रीडा डॉ. अनिता लोखंडे उपस्थित होते.
परिसरातील नागरिक, महिला, युवक-युवती, क्रीडाप्रेमी, योगपटू, महाविद्यालयातील व शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनी सहभागी झाले होते.

2/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे