स्पार्क ‘या अभ्यासक्रमाच्या अंतर्गत एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन ,
मुख्य संपादक :- संतोष मेश्राम

एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन
गोंडवाना विद्यापीठाचे घटक महाविद्यालय मॉडेल डिग्री कॉलेज व शोध ग्राम सर्च या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण समाजात व्यसनाविरुद्ध सामाजिक कार्यक्रम ‘स्पार्क ‘या अभ्यासक्रमाच्या अंतर्गत एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन.
गडचिरोली .
गोंडवाना विद्यापीठाचे घटक महाविद्यालय मॉडेल डिग्री कॉलेज व शोध ग्राम सर्च या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण समाजात व्यसनाविरुद्ध सामाजिक कार्यक्रम ‘स्पार्क ‘या अभ्यासक्रमाच्या अंतर्गत एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात होते.
या कार्यशाळेचे उद्घाटक म्हणून गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे होते.अधिष्ठाता मानव विज्ञान डॉ. चंद्रमौली,संचालक नवसंशोधन ,नवोपक्रम व साहचर्य डॉ. मनीष उत्तरवार ,मॉडेल कॉलेजचे प्राचार्य डॉ. शशिकांत आस्वले ,सर्चचे सहसंचालक तुषार खोरगडे यांची उपस्थिती होती.
सदर उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यशाळेच्या पहिल्या सत्राचे प्रास्ताविक गोंडवाना विद्यापीठाच्या मॉडेल कॉलेज चे प्राचार्य डॉ. शशिकांत आस्वाले यांनी तर आभार सहसंचालक मुक्तीपथ संतोष सावरकर यांनी मानले.यावेळी स्पार्क अभ्यासक्रमाच्या तेरा विद्यार्थ्यांनी आपला परिचय दिला आणि अभ्यासक्रमा विषयी समाधान व्यक्त केले.
सदर कार्यशाळा ‘ पेसा कायदा व मादक द्रव्य समितीतून दारूबंदी,पेसा कायद्याची ग्रामसभेमध्ये उपयुक्तता’या विषयावर सृष्टी संस्थेचे संचालक केशव गुरनुले यांनी तर
लोकसत्ता चे पत्रकार सुमित पाकलवार यांनी ‘पेसा कायदा आणि बातम्या’ या विषयावर मार्गदर्शन केले.
या एक दिवसीय कार्यशाळेला विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला . या कार्यशाळेच्या दोन्ही सत्राचे संचालन मॉडेल डीग्री कॉलेज चे समन्वयक डॉ.संदीप लांजेवार यांनी केले .या कार्यशाळेला विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला.