Breaking
गडचिरोली

लाच घेतांना वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात

मुख्य संपादक :- संतोष मेश्राम

वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात

गडचिरोली :-     (  एटापल्ली )

एटापल्ली :- तालुक्यातील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयातील वनरक्षकास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने १७ जुन रोजी रंगेहाथ पकडले सदर कारवाहीने वनविभागात खडबड उडाली आहे. एसीबीच्या जाळ्यात अडकलेल्या वनरक्षकाचे नाव धनीराम अंताराम पोरेटी वय (३३) वर्षे असे लाच स्वीकारलेल्या वनरक्षकाचे नाव आहे. रेतीची वाहतूक करीत असलेले दोन ट्रॅक्टर पकडुन कोणतीही कारवाई न करता सोडुन दिले व त्या मोबदल्यात १५ हजार रुपयाची लाच रक्कम देण्यास सांगीतले. एटापल्ली नाक्याजवळ दोन ट्रॅक्टर पकडुन कोणतीही कारवाई केली नाही. तसेच तक्रारदार यांचेकडून ३० हजार रुपये लाच रक्कमेची मागणी केली परंतु तडजोडीअंती १५ हजार रुपये लाच रक्कम सेतु दुकानात स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.या प्रकरणी एटापल्ली पोलिस ठाण्यात कलम ७ भ्रष्टाचार प्रतीबंधक अधिनियम १९८८ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदर कारवाही पोलिस निरीक्षक श्रीधर भोसले,पोलिस हवालदार नत्तू धोटे, ना.पो. शिपाई राजेश पदमगिरवार, पो. शिपाई स्वप्नील बांबोळे , किशोर ठाकूर, संदीप खोडमोले, संदीप उडान,पो. ह.अंगडलवार यांनी केली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे