
प्रसुतीनंतर अवघ्या 24 तासात मातेचा मुत्यु
दणका कायद्याचा डिजिटल. न्युज
चंद्रपूर
कोरपना :-
दि .29/ 01/2024 .
कोरपना येथील प्रसुतीसाठी महीलेला दवाखान्यात दाखल करण्यात आले. त्यानंतर बाळ सुखरूप झाले.मात्र प्रसुतीनंतर अवघ्या चोवीस तासातच चंद्रपूर येथील एका खाजगी रुग्णालयात सोमवारी दिनांक 29 जाने. 24 ला सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास मातेचा मुत्यु झाल्याची घटना घडली.
प्रतीभा जयंत जेनेकर वय ( 30) वर्ष.रा कोरपणा असे मुत्यु झालेल्या मातेचे नाव आहे.प्रतिभा जेनेकररा.कोरपना ह्या मातेला प्रसुतीसाठी चंद्रपूर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.उपचार सुरू असताना एका गोडस बाळाला जन्म दिला.
त्यानंतर सर्व काही ठिक असताना सोमवारी अचानक 10.30 वाजताच्या सुमारास प्रतिभाचा उपचार सुरू असताना अचानक ,खाजगी रुग्णालयात मुत्यु झाला. एकिकडे मुलगी झाल्याच आंनद तर दुसरीकडे दु:ख आणि प्रसुतीनंतर अवघ्या चोविस तासात मातेचा मुत्यू झाल्याची घटना घडली. त्यामुळे ,जेनेकर कुंटुंबीयांनवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.तसेच मागील वर्षीच जयंता प्रतिभाशी विवाह सोहळा झाला होता .सर्व ञ हळहळ व्यक्त केली जात आहे.