देश-विदेश
बापरे पाच मुलाच्या आईने एका वर्षात तीन लग्न करून तरुणांकडून लुटले 36 लाख फरार महिलेचा शोध सुरू
मुख्य संपादक :- संतोष मेश्राम

बापरे पाच मुलाच्या आईने एका वर्षात तीन लग्न करून तरुणांकडून लुटले 36 लाख फरार महिलेचा शोध सुरू
दणका कायद्याचा न्युज .
दिनांक 2/12/2024.
चिन,
एका वर्षाच्या आतच ३ तरुणांशी लग्न करून त्यांना थोडाथोडका नाही तर तब्बल ३६ लाखांचा गंडा घालणाऱ्या महिलेचा किस्सा नुकताच चीनमध्ये उघडकीस आला आहे. त्याहूनही धक्कादायकी म्हणजे, पोलिसांच्या चौकशीतून समोर आलं की, महिलेला आधीच पाच मुलं आहेत आणि अशाप्रकारे लग्न करूनच ती पैसे कमावते. सध्या ही महिला फरार असून पोलीस महिलेचा शोध घेत आहेत.