
दोन ट्रकच्या समोरासमोरील धडकेत एक जण जागीच ठार
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
दि.21.6.24.
आष्टी : गडचिरोली महामार्गावर दोन ट्रकच्या समोरासमोरील धडकेत एक ट्रकचालक जागीच ठार झाल्याची घटना २१ जून रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास आष्टी- गडचिरोली महामार्गावर कोणसरी प्रकल्पाच्या समोर घडली. विकास कुमार बिंद (२४) जिल्हा आदिलाबाद असे मृतकाचे नांव आहे. दुसरा ट्रक चालक जितेंद्र कुमार पटेल (२९) हा किरकोळ जखमी आहे.
अपघाताची माहिती आष्टी पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक विशाल काळे घटनास्थळी पोहोचले आणि मृतव्यक्तीला ट्रकमधून बाहेर काढले त्यानंतर त्याचे प्रेत पोस्टमार्टम करिता आष्टी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहे. पुढील तपास आष्टी पोलीस करीत आहेत.