
रेल्वेमार्गाच्या कामासाठी अवैध मुरूम उत्खनन करणाऱ्या जे.पी. इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीवर कार्यवाही करा ..
कुणाल पेंदोरकर यांचे ना. विजय वडेट्टीवार यांना निवेदन
– विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे जिल्हाधिकारी दैने यांना चौकशीचे आदेश.
– अधिवेशनात लावून धरणार मुद्दा
– जिल्हा खनिकर्म अधिकारी बरडे यांची भूमिका संशयास्पद निवेदन देण्याकरिता गेले असता ऑफिस मधून काढला.
दणका कायद्याचा डिजिटल न्यूज
प्रतिनिधी / गडचिरोली
गडचिरोली जिल्हा खनिज संपतीने नटलेला जिल्हा आहे. गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या वडसा ते गडचिरोली रेल्वे ट्रॅक चे काम सुरू आहे. त्या कामावर रेल्वे मार्गाच्या भरावासाठी मुख्यालया पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या अडपल्ली, गोगाव, सालाईटोला, खरपुंडी, माडेतुकूम, लांझेडा या गावांमधून मोठ्या प्रमाणात गौण खनिजाचे उत्खनन पोकलँड यांच्या साह्याने २० हायवाच्या मदतीने लाखो ब्रासचे उत्खनन २४ तास सुरू आहे.
शासनाचे लाखो ब्रास गौण खनिज विनापरवाना चोरी होत असताना सुद्धा महसूल विभागाकडून कोणतीही कारवाई होत नाही ही शंकेची बाब आहे, बैलबंडी, ट्रॅक्टर,रेती- मुरूम वाहतूक करणाऱ्या वर महसूल विभाग लगेच कारवाई करतात. पण रेल्वे कामाच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची कारवाई महसूल विभागाकडून होताना दिसत नाही. महसूल विभागाचे काय हिट संबंध कंपनीसोबत आहेत का? अशी शंका व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांकडून सातबारा घेऊन ठरवून दिलेल्या ब्रास व्यतिरिक्त लाखो ब्रास चे उत्खनन या कंपनीने केलेले आहे. या कंपनीकडे कोणतेही गोणखणीज वाहतूक परवाना नसताना सुद्धा यांना वाहतूक करण्याची परवानगी कशी का देण्यात आली हा प्रश्न उपस्थित होतो आहे. अवैद्यपणे उत्खनन केलेल्या गौण खनिजाची मोजणी करून शासकीय नियमानुसार प्रतिब्रास प्रमाणे जे.पी. इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीवर कार्यवाही करण्यात यावी. आणि पोकलँड आणि हायावा यांच्यावर कार्यवाही करून जप्ती करण्यात यावे. काही ठिकाणी शासकीय जागेवर सुद्धा मुरूमचे अवैध उत्खनन होताना दिसत आहे. मौजा खरपुंडी येथील बोळीमध्ये बांधाऱ्याच्या साठी राखीव असलेल्या शासकीय जागेवर व माडेतुकूम येथील मामा तलावातुन हजारो ब्रास अवैध उत्खनन या कंपनीने केलेले आहे. तरीही महसूल विभागकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही होतांना दिसत नाही. रेल्वे मार्गाच्या कामामुळे पायदान रस्त्याची सुद्धा नुकसान करण्यात आलेले आहे. शेतीच्या हंगामाना नुकतीच सुरवात होणार असून पायदान रस्ते सुद्धा रेल्वे कामाकडून नष्ट करण्यात आलेले आहे. शेतकरी मशागती साठी शेतात कसे जाणार किव्हा इतर साहित्य कसे शेतात नेणार हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
तसेच रेल्वे मार्गाच्या भरावासाठी CRB टेस्टिंग केलेले मुरूम वापरण्यात येते परंतु याठिकाणी भिसी मातीचा वापर करून निष्क्रिय दर्जाचे काम करण्यात येत आहे. या संबंधची संपूर्ण चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १० तारखेपासून अन्नत्याग आंदोलन करण्यात येईल. असा इशारा युवक काँग्रेसचे प्रदेश सहसचिव कुणाल पेंदोरकर यांनी दिला आहे.
विरोधीपक्ष नेते ना. विजय वडेट्टीवार यांना निवेदन देतांना कुणाल पेंदोरकर –
त्यावेळी उपस्थित ना. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना निवेदन देताना कुणाल पेंदोरकर त्यावेळी डॉ. नामदेव किरसाण, ऍड. राम मेश्राम, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, हसणं गिलानी,अतुल मल्लेलवार, नंदू कायरकर, मल्लिक बुधवानी,अरिफ कनोजे, प्रफुल आंबोरकर उपस्थित होते.