
चामोर्शी तालुक्यातील नवरगाव येथील संविधान फलकाला जातीयवाद्याने काळे फासले …
नवरगाव येथील घटणा …
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
दिनांक १२/०३/२०२४.
गडचिरोली / चामोर्शी
चामोर्शी तालुक्यातील नवरगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील संविधान चौकाच्या नामफलकाला काही जातीय वादीलोकांनी हिरव्या रंगाचे पेंन्ट फलकाला लावुन काळे फासणारी घटणा आज दि.12/03/2024. ला पहाटेच्या सुमारास उघडतीस आली. सदर प्रकरणाची रीपोर्ट डायमंड वाकडे ,प्रमोद गोवर्धन ,व संपूर्ण बौद्ध बांधवानी पोटेगाव पोलिस स्टेशनला तक्रार दिली आहे.हा वाद काही गेल्या एक वर्षा पासूनच सुरू होता .परंतु बौद्ध बांधव व जातीयवादी लोकांना पोलिस अधीक्षक गडचिरोली यांच्या कडून तोडगा काढुन हा वाद मिटवण्यात आला होता परंतु आज पुन्हा अशा जातीयवादी लोकांनी केलेल्या क् त्यामुळे बौद्ध बांधव पेटुन उठणार आहेत .तसेच चामोर्शी तालुक्यातील सर्व बौद्ध जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून न्याय हक्काचा लढा देणार आहेत .
तसेच संविधान चौकाच्या आजुबाजुला तिन कँमेरे बसविले आहेत .त्यामुळे पोलिसांनी फुटेज तपासणी करून संविधान चौकाला देण्यात आलेले नाव कोणत्या जातीयवादी लोकांनी मिटविले ,व कोणाच्या सांगण्यावरुन ,त्यांना ह्या मागे कोणाचा हात आहे हे स्पष्ट उघडतीस झाले पाहिजे. आणि अशा निच हरामखोर जातीयवादी लोकांना जेरबंद करावा अशी मागणी बौद्ध बांधवांनी करत आहेत.
वाद समझोता करून लावण्यात आलेले संविधान चौक नावाचे नाम फलक परंतु ह्या च फलकावर जातीयवाद्याने फलकावरील नाम मिटविले आहे.
तसेच कँमरे बंद असतील तर ग्रामपंचायत याच्यावर गुन्हा नोंद करण्यात यावा अशा सर्व प्रकारची कसुन चौकशी पोलिसांनी करावी अशी मागणी बौद्ध बांधवांनी पोटेगाव पोलिसांना तक्रार देताना केली आहे. अंधाराचा फायदा घेत हा प्रकार केल्याचे सांगितले जाते.
सदर दोषींवर कडक कारवाई करावी. अन्यथा आंदोलन छेडण्याचा ईशारा बौद्ध बाघवांनी तथा रिपब्लिकन पार्टी तफेँ दिला आहे.