
रात्रीचे सुमारास गाढ झोपेमध्ये असलेल्या व्यक्तीवर अज्ञात व्यक्तीने त्याच्या अंगावर पेट्रोल ओतुन पेटवून दिले…व पळ काढला !
छल्लेवाडा गावातील थरारक घटणा …
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
गडचिरोली
अहेरी:
सध्याच्या घडीला उकाळा वाढल्याने अंगणात खाट टाकून झोपून असलेल्या इसमावर अज्ञात वेक्तीने अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची धक्कादायक तेवढीच खळबळजनक घटना गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील छल्लेवाडा येथे 2 जून रोजी उघडकीस आली. चरणदास गजानन चांदेकर (वय 48) असे जळालेल्या इसमाचे नाव असून त्याच्यावर चंद्रपूर येथील रुग्णालयात येथे उपचार सुरु असल्याची माहिती. मिळाली आहे.
वाढत्या तापमानामुळे अंगाची लाही लाही होत आहे. याची झळ जिल्ह्यातील जंगलव्याप्त भागातही पडतांना दिसत असून ग्रामीण भागात रात्रोच्या सुमारास आपल्या अंगणात नागरिक झोपत असतात. अश्यातच अहेरी तालुक्यातील छल्लेवाडा येथील चरणदास चांदेकर हे सुद्धा घरासमोरील अंगणात खाटेवर निवांतपणे झोपलेले होते. दरम्यान रात्रीचे सुमारास गाढ झोपेमधे अज्ञात व्यक्तीने त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले व तिथून काढता पाय घेतला. यावेळी त्यांच्या बाजूला झोपून असलेल्या कुटुंबातील इतर सदस्यांना लक्षात येताच आग विझविली मात्र तोपर्यंत चरणदास हे आगीत गंभीर जखमी झाले होते लागलीच चंद्रपूर येथे त्यांना उपचारासाठी हलविण्यात आले असून त्यांची मृत्यूशी झुंज सुरु असल्याचे कळते. या थरारक घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करीत आहे.