
संताप जनक बातमी ! वर्गात फोन वाजला म्हणून ,मुलीचे अंतर्वस्त्र कपडे काढून तपासणी करणाऱ्या शिक्षिकेवर गुन्हा दाखल ।
दणका कायद्याचा डिजिटल न्युज .
मघ्यप्रदेश ( इंदुर )
दिनांक 16/8/24.
मध्य प्रदेशातील इंदूर येथून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. येथील मल्हारगंज मधील एका सरकारी शाळेत एका महिला शिक्षिकेने मुलींना त्यांचे अंतर्वस्त्र काढायला लावून आणि पॅड हटवून फोनची तपासणी केली. याप्रकरणी आता संबंधित शिक्षकाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. महत्वाचे म्हणजे, उच्च न्यायालयाने प्रशासनाला कारवाईसाठी एक आठवड्याची मुदत दिली होती. यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला.