माती विरहित शेती, विज्ञान प्रकल्पासाठी तृतीय पुरस्कार!जिल्हा पोलिस अधीक्षकांची विद्यार्थ्यांनवर कौतुकाची थाप!
कार्यकारी संपादक :- अनुप मेश्राम

माती विरहित शेती, विज्ञान प्रकल्पासाठी तृतीय पुरस्कार!जिल्हा पोलिस अधीक्षकांची विद्यार्थ्यांनवर कौतुकाची थाप!
दणका कायद्याचा डिजिटल न्युज.
कार्यकारी संपादक.
अनुप मेश्राम.
गडचिरोली.( दि.27. डिसेंबर ).
जिल्हा पोलिस अधीक्षक श्री. निलोत्पल यांनी पोलिस वेलफेअर एज्युकेशन सोसायटी गडचिरोली द्वारा संचालित सरस्वती विद्यालयाच्या तालुका स्तरीय विज्ञान स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप दिली.
शालेय शिक्षण विभाग गडचिरोली द्वारा दि.२१, २२ व २३ डिसेंबरला तालुका विज्ञान व शैक्षणिक साहित्य प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. पोलिस संकुल परिसरातील सरस्वती विद्यालयात इयत्ता सातवी मध्ये शिकत असलेल्या रुद्र जवादे आणि इयत्ता सहावी मध्ये शिकत असलेल्या समर कावळे या विद्यार्थ्यांना त्यांच्या *”माती विरहित शेती”* या विज्ञानविषयक प्रकल्पासाठी तृतीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
या प्रदर्शनीचे आयोजन स्थानिक भगवंतराव हिंदी हायस्कूल येथे करण्यात आले होते. वनवैभव शिक्षण प्रसारक मंडळ अहेरीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला होता.
२७ डिसेंबर 2023 ला जिल्हा पोलिस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी या दोन्ही विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या यशाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी सरस्वती विद्यालयातील शिक्षक वृंद जिद्दीने काम करीत आहेत.
याप्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापक लक्ष्मी केतकर, मार्गदर्शक शिक्षिका सौ.दिपाली सोरते व श्री.अनुराज काळेवार उपस्थित होते. सरस्वती विद्यालयाच्या संपूर्ण परिवाराकडून रुद्र व समरचे कौतुक केले जात आहे. या यशाचे श्रेय विद्यार्थ्यांनी शिक्षिका दिपिका सोरते आणि शिक्षक वृंदाना दिले आहे.