
यवतमाळात मघधुंद कार चालकाने सहा वाहनांना उडवले तीन जण जखमी
दणका कायद्याचा डिजिटल न्युज .
यवतमाळ ,
दिनांक 12/12/2024
शहरातील आर्णी मार्गावर मंगळवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास सुसाट जाणाऱ्या कारचालकाने सहा वाहनांना धडक दिली. रस्त्याच्या कडेला बसलेल्या भाजीविक्रेत्यांनाही या वाहनाने ठोकरले. या घटनेमुळे वर्दळीच्या रस्त्यावर एकच खळबळ उडाली. कारचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे आढळल्यानंतर उपस्थित नागरिकांनी त्याला घटनास्थळी चांगला चोप दिला. या अपघातात तीनजण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात आले.