अपघात
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या पाच तरुणांना एसटी बसने चिरडले तिघांचा जागीच मृत्यू।
मुख्य संपादक संतोष मेश्राम

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या पाच तरुणांना एसटी बसने चिरडले तिघांचा जागीच मृत्यू।
बीड,
एसटी महामंडळाच्या बसने पाच तरुणांना चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बीड-परळी रस्त्यावर असलेल्या घोडका राजुरी फाट्याजवळ हा अपघात घडला. अपघातात पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघांवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दररोजप्रमाणे आजही पहाटे सर्वजण व्यायामासाठी रस्त्यावर गेले होते.