
शिक्षण हे जीवनातील सर्वात शक्तिशाली साधन – मधुकर वासनिक
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
सावली
शिक्षण ही मानवी जीवनातील सर्वात शक्तिशाली गोष्टींपैकी एक आहे.शिक्षण केवळ आपल्याला शिकवतच नाही तर माणसाला अधिक हुशार आणि जबाबदार माणूस बनविण्यास मदत करतो.शिक्षण हे एकमेव माध्यम आहे जे आपल्याला यशाकडे घेऊन जाते.शिक्षणामुळे आपण जगात सर्वोत्कृष्ट बनतो असे विचार उद्घाटन प्रसंगी सावली पंचायत समितीचे गट विकास अधिकारी मधुकर वासनिक यांनी मांडले.
सावली तालुक्यातील बोथली येथे पंचायत समिती सावली आणि ग्रामपंचायत बोथली यांच्या संयुक्त विद्यमाने आज अभ्यासिका वर्गाचे उद्घाटन पंचायत समिती सावलीचे गट विकास अधिकारी मधुकर वासनिक यांचे हस्ते करण्यात आले.तसेच गावातील वर्ग ८ ते १२ च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोथलीचे सरपंच सुशील नरेड्डीवार होते तर मार्गदर्शक म्हणून सावली पोलीस स्टेशनचे ठाणेदार जीवन राजगुरू वर्तमान शैक्षणिक परिस्थिती आणि पुढील आव्हाने याची सांगड घालत मार्गदर्शन केले.मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून बोथलीचे उपसरपंच नरेश गड्डमवार,पोलीस पाटील ताराचंद खोब्रागडे,प्रा.शेखर प्यारमवार,मुख्याध्यापक कमलाकर पाडेवार,प्रदीप पा. गड्डमवार,जी.प.मुख्याध्यापक आदर्लावार सर उपस्थित होते.
यावेळी बोथली स्थित दोन्ही विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच नवरत्न स्पर्धेत क्रमांक पटकाविलेल्या विद्यार्थांचा सत्कार करण्यात आला.आयोजित कार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थी,ग्रामपंचायत सदस्य,बचत गटाचे पदाधिकारी,अंगणवाडी सेविका,आशा वर्कर,गावातील युवक व नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.शेखर प्यारमवार,संचालन कोलते सर तर आभार पोलीस पाटील ताराचंद खोब्रागडे यांनी मानले.
*बाईट*
बोथली ग्रामपंचायतीने एक चांगला उपक्रम हाती घेतला असून याचा आदर्श इतरही ग्रामपंचायतीने घ्यावा जेणेकरून गावातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना अभ्यासाची आवड निर्माण होऊन भविष्यात यश संपादन करता येईल.
मान.जीवन राजगुरू
ठाणेदार पोलीस स्टेशन,सावली