
तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष भिवापूर तर्फे वार्षिक सर्वसाधारण सभा तथा वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रम.
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
नागपुर/ उमरेड
आज दिनांक 14/02/2024 रोज मंगळवारी भिवापूर तालुक्यातील सालेशहरी(सालेभट्टी पूर्ण)येथे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवानोन्नती अभियान- तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष भिवापूर तर्फे वार्षिक सर्वसाधारण सभा तथा वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रमाचे उदघाट्न आमदार राजु पारवे यांच्या हस्ते करण्यात आला .
उपस्थित सर्व महिला भगिणींशी संवाद साधला. त्यांच्या उमरेड या मतदारसंघातील तीनही तालुक्यामध्ये महिला बचत भवन मंजूर केले असून येणाऱ्या काही दिवसात माझ्या बचत गटातील बहिणींना हक्काची जागा उपलब्द होणार आहे असा विश्वास यावेळी दिला.