
नक्षल्यांकडून पुन्हा एकाची हत्या – अहेरी तालुक्यातील कापेवंचा येथील घटना
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
गडचिरोली. दि 25 .नोव्हेंबर
दक्षिण गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी पुन्हा डोके वर काढले असून महिनाभरात नक्षलवाद्यांनी तीन इसमांची हत्या केली आहे. त्यामुळे या भागात खळबळ उडाली आहे.
अहेरी तालुक्यातील राजाराम उप- पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या दुर्गम भाग असलेल्या कापेवंचा येथील रामजी आत्राम या युवकाची शुक्रवारी नक्षलवाद्यांनी शेतात जाऊन गोळ्या घालून हत्या केली आहे. पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून ही हत्या झाली असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
आपल्या शेतात काम करीत असताना संध्याकाळच्या सुमारास आलेल्या सशस्त्र नक्षलवाद्यांनी शेतात जाऊन गोळ्या झाडून हत्या केली आहे. त्यामुळे महिनाभरात नक्षलवाद्यांनी केलेली ही तिसरी हत्या असून या घटनांमुळे दक्षिण गडचिरोली भागात नक्षलवाद्यांनी पुन्हा डोके वर काढून रक्तपात सुरू केला आहे.
याआधी दिवाळीच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यानंतर दुसऱ्या दिवशी १५ नोव्हेंबरला भामरागड तालुक्यातील पेनगुंडा येथे दिनेश गावडे, २३ तारखेला एटापल्ली तालुक्यातील टिटोळा येथील पोलीस पाटील लालसू वेडदा यांची नक्षलवाद्यांनी हत्या केली होती. त्यामुळे दक्षिण गडचिरोली भागात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.