
बापरे ! वकिलाने थाटलं खोटे न्यायालय ,स्वतःच जज बनत गेली पाच वर्षे करायचा न्याय निवाळा ।
दणका कायद्याचा डिजिटल न्युज.
दिनांक 23/10/2024.
अहमदाबाद ,
अहमदाबाद शहर पोलिसांनी मॉरिस ख्रिश्चन नावाच्या व्यक्तीविरोधात एफआयआर दाखल केली असून व्यवसायाने वकील असलेल्या मॉरिस दिवाणी न्यायालयासमोर बनावट कोर्ट चालवत होता. स्वत: न्यायाधीश असल्याचे भासवत फसव्या लवादाच्या माध्यमातून विशेषत: जमीन व्यवहाराच्या खटल्यांचा निवाडा करत होता. त्यासाठी त्याने बनावट न्यायालय तयार करून कोर्टात कर्मचारी आणि वकील तैनात केल्याचेही समोर आले आहे.