Breaking
गडचिरोली

जमीनी हस्तांतरण विरोधात ग्रामसभा घेऊन गावात लावले गावबंदीचे फलक

मुख्य संपादक

 

जमीनी हस्तांतरण विरोधात ग्रामसभा घेऊन गावात लावले गावबंदीचे फलक

दणका कायद्याचा डिजिटल न्युज

गडचिरोली

चामोर्शी तालुक्यातील कोनसरी जवळील १० कि. मी. अंतरावर असलेला मुधोली च. नं.२ येथील ग्रामस्थांच्या जमिनी हस्तांतरण करण्याकरिता लॉड्स मेटल्स अधीकारी गावात गेले असता ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला तसेच ४ डिसेंबर रोजी ग्रामसभा घेऊन या विषयावर चर्चा करण्यात आली .
तसेच मुधोली च. नं.२ येथे ग्रामसभेला वृध्द, महीला, पुरुष व सर्व युवक , युवती या सर्वानुमते कोनसरी प्रकल्पासाठी जमीनी हस्तांतरीत न करण्याचा निर्णय पारित करण्यात आला. तसेच अनेक वर्ष पिढन पिढ्यान पासून च्या जमिनी गावकरी कसत असुन त्या जमिनीवर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत तसेच त्यांचा घरामधे काही पूर्वजांच्या आठवणी सुद्धा दळलेल्या आहेत. सदर त्या जमिनीवर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असताना या प्रकल्पाच्या अधिकाऱ्याने व शासनाने मुधोली च.नं.२ या गावात जाऊन तुमच्या जमिनी कंपनीला हस्तांतरीत करून द्या असे बोलल्याने समस्थ गावकरी संतप्त झाले आहे असून गावकरी आमच्या जमिनी नष्ट होतील म्हणून गावकरी तीव्र विरोध करीत आहेत.

तसेच संपुर्ण गावकरी आक्रोश निर्माण केला असुन तीव्र निषेध दर्शविला आहे. या पार्शवभूमीवर आपल्या जमिनी हस्तांतरण करण्याकरीता कोणताही उद्योजक व अधिकारी, लोकप्रतिनिधी, गावात आल्यास व यांच्याशी चर्चा कुणीही करणार नाही अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे. तसेच ग्रामसभा घेण्यात आली त्यावेळेस ग्रामसभेला उपस्थीत असलेले संपुर्ण गावकऱ्यानी कोणतेही कंपनीचे अधिकारी गावामधे येवु नये म्हणुन गावात प्रवेश बंदी आहे अशा जाहीर सूचना करुन माझे गाव माझी जमीन अशी भूमिका घेतली आहे.

तसेच जमिनी संबधित चर्चा किवा हस्तातरित करण्याकरिता येणाऱ्या शासनाच्या व कंपनीच्या कर्मचाऱ्यांना गावात प्रवेश बंधी घातली आहे, सदर या सूचनेचे उलघन झाल्यास सदर प्रतिनिधिस जनतेच्या हवाली करण्यात येईल तसेच संपुर्ण गावकरी आक्रमक झाले असुन याठिकाणी अनुचित प्रकार घडल्यास यावर गावकरी जिमेदार राहणार नाही व गावकऱ्यांवर कोणतेही गुन्हे दाखल होणार नाही याची नोंद घ्यावी अशप्रकरे जाहीर सूचना करुन समस्थ मुधोली च. नं.२येथिल ग्रामवसियानी गवात प्रवेश करू नये असे फलक लावले आहे.

कोणीही या विषयावर गावात आल्यास संपुर्ण गावकरी एकवटतील व अश्या वेळी अनुचित प्रकार घडल्यास गाव जबाबदार राहणार नाही असा इशारा देण्यात आला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे