राजकिय
धनंजय मुंडे च्या आणखी अडचणी वाढल्या सुरेश धसांनी अजित पवारांना दिला पुराव्यांचा पेन ड्राईव्ह
मुख्य संपादक, संतोष मेश्राम

धनंजय मुंडे च्या आणखी अडचणी वाढल्या सुरेश धसांनी अजित पवारांना दिला पुराव्यांचा पेन ड्राईव्ह .
दिनांक ३०/१/२५.
बीड,
बीडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार पहिल्यांदाच जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले. अजित पवारांच्या पहिल्या दौऱ्यात भाजपचे आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या आरोपांसंदर्भातील पुरावे सादर केले. धस यांनी अजित पवारांना पुराव्यांचा एक पेनड्राईव्ह दिला. महत्त्वाचं म्हणजे बीड डीपीसीची बैठक सुरू असतानाच हा पेनड्राईव्ह दिल्याने बैठकीत शांतता पसरली होती. महायुती सरकारमधील आमदारनेच पुरावे दिल्याने पुन्हा एकदा धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढण्याची चर्चा सुरू झाली आहे.