
ग्रामविकासाकरिता युवकांनी पुढाकार घ्यावा; मधुकर वासनिक.
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
दि. 17/ जाने .2024 .
सावली :-
राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय व ग्रामपंचायत जिबगाव च्या वतीने आयोजित राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचा उद्घाटनीय सोहळा जिबगाव येथे पार पडला या सोहळ्याच्या उद्घाटनिय स्थानावरून बोलताना मधुकर वासनिक गटविकास अधिकारी यांनी गावाच्या विकासात युवकांची भूमिका महत्त्वाची असून आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये विविध योजनांचा लाभ आपल्या कुटुंबांना कशाप्रकारे प्राप्त करून देता येईल व आपल्या कुटुंबाचा व समाजाचा विकास कसा प्रकारे साधता येईल यासाठी युवकांनी प्रयत्न करावे असे मोलाचे मार्गदर्शन केले.
या उद्घाटनीय सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक खोब्रागडे होते अतिथी जिबगाव ग्रामपंचायत सरपंच पुरुषोत्तमजी चुदरी, उपसरपंच मोनीताई उंदीरवाडे ग्रामपंचायत सदस्य राकेश गोल्लेपलीवार, उरकुडे , डॉ. दिवाकर उराडे आदी मान्यवर उपस्थित होते .
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी पुरुषोत्तम चुदरी यांनी शिबिराच्या माध्यमातून गावाच्या विकासात महत्त्वाचा हातभार लागत असून शिबिरामध्ये होणारा श्रमदान, बौद्धिक मार्गदर्शन, सांस्कृतिक प्रबोधनाच्या माध्यमातून गावामध्ये एक चैतन्यमय वातावरण निर्माण होते असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अशोक खोब्रागडे यांनी शिबिर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासात महत्त्वाची भूमिका पार पाडत असते .
शिबिरातून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण सामाजिक बांधिलकी विकसित होत असून उद्याचा सक्षम नागरिक राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून घडत असते असे विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. दिलीप कामडी यांनी केले. संचालन प्रा. स्मिता राऊत तर आभार अक्षय मुद्रीवार यांनी मानले यावेळी प्रा. प्रशांत वासाडे, डॉ.भास्कर सुकारे, प्रा. दिलीप सोनटक्के, प्रा.संदीप देशमुख, डॉ. प्रफुल वैराळे , प्रा. सगानंद बागडे, डॉ. विजयसिंह पवार उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. रामचंद्र वासेकर, डॉ. दिलीप कामडी, प्रा. स्मिता राऊत , प्रा. सचिन वाकडे तसेच जिबगाव ग्रामवासी यांचे सहकार्य लाभले.