आंदोलन कर्त्याच्या आंदोलनाला आले यश! वनरक्षक राजेश दुर्गे ठरले आंदोलनाचे बळी!
कार्यकारी संपादक :- अनुप मेश्राम

आंदोलन कर्त्याच्या आंदोलनाला आले यश! वनरक्षक राजेश दुर्गे ठरले आंदोलनाचे बळी!
दणका कायद्याचा डिजिटल न्यूज.
कार्यकारी संपादक.
अनुप मेश्राम.
गडचिरोली.( दि.16 आक्टोबर )
सामाजिक कार्यकर्ता योगाजी कुडवे व त्यांच्या समर्थकांनी उभारलेल्या आंदोलनाला अखेर यश आलेले असून, मनमर्जीने कागदोपत्री संयुक्त वनसमिती तयार करून पैशाचा दुरुपयोग करणारे वनरक्षक राजेश दुर्गे योगाजी कुडवे यांच्या आंदोलनाचे बळी ठरलेले आहेत.
वनरक्षक राजेश दुर्गे यांच्या निलंबनासाठी योगाजी कुडवे व त्यांच्या समर्थकांना ठिय्या आंदोलन, ढोल बाजाव आंदोलन अर्धनग्न आंदोलन,मुंडन आंदोलन असे अनेक आंदोलन करावे लागले,तेव्हाच गडचिरोली उपवनसंरक्षकांनी योगाजी कुडवे यांच्या आंदोलनाची दखल घेऊन राजेश दुर्गे यांच्या निलंबनाचा आदेश पारित केले.
योगाजी कुडवे यांच्या आंदोलनाचा राजेश दुर्गे हे प्रशासनातील 19 वे बळी ठरले आहेत.