प्रतिबा लाडे VIPJP या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्षा पदी नियुक्ती !
कार्यकारी संपादक :- अनुप मेश्राम

प्रतिबा लाडे VIPJP या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्षा पदी नियुक्ती:
दणका कायद्याचा डिजिटल न्युज.
कार्यकारी संपादक.
अनुप मेश्राम.
गडचिरोली.
सौ प्रतिबा लाडे ही गडचिरोली तालुक्यात येत असलेल्याआमिर्झा येथील रहिवासी असून मागील अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या सामाजिक व सांस्कृतिक संघटनेत फुले शाहू आंबेडकर यांचे विचार जनमानसात रुजवीत आहेत.त्यांनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर निर्मित राष्ट्रीय ग्रंथाचेव त्या ग्रंथात समाविष्ट असलेल्या मानव अधिकारांची सामान्य लोकांना माहिती व्हावी यासाठी ते सातत्याने प्रयत्न करीत आहेत.
त्यांनी केलेल्या जनजागृती कार्याची दखल घेऊन आदरणिय डॉ गजभिये साहेब आंतरराष्ट्रीय अध्यक्ष वाईस इंडिजीयस पिपल फार जस्टिस ॲन्ड पिस व तसेच राष्ट्रीय सचिव अडव्होकेट किशोर कांबळे साहेब, मुंबई आणि राज्य सचिव प्रोफेसर धम्मदीप गजभिये साहेब आदि मान्यवरांनी प्रदिर्घ विचार विमर्श करून सौ प्रतिबा लाडे यांना वाईस इंडिजीयस पिपल फार जस्टिस ॲन्ड पिस या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या गडचिरोली महीला जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
या निवडीबद्दल डॉ नामदेव वसंताबाई भिकाजी खोब्रागडे विदर्भ अध्यक्ष वाईस इंडिजीयस पिपल फार जस्टिस ॲन्ड पिस गडचिरोली,डॉ गजभिये साहेब, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार अध्यक्ष, कांबळे साहेब, मुंबई, राज्य सचिव डॉ धम्मदीप गजभिये, कैलास लाडे,कुनघाडकर, सूरज धुळसे,वासूदेव जी लाडे साहेब, गजानन कोंडागुर्ले,सिरोंचा, आदि मान्यवरांनी सौ प्रतिबा लाडे यांचे अभिनंदन केले.
या निवडीबद्दल प्रतिबा लाडे यांचे सर्व स्तरातील लोकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.