
प्रवासी बस स्थानकातच केली जाते खुलेआम ताडी विक्री।
प्रशासनाचा ताडी विक्रीवर कानाडोळा.
दणका कायद्याचा डिजिटल न्युज .
गडचिरोली
चामोर्शी : तालुक्यातील लखमापूर बोरी येथे मागील सहा-सात वर्षा पासून उन्हाळ्यातील दिवसात खुलेआम अवैध नशीली ताडी विक्री केली जात आहे. मात्र ह्या वर्षी पावसाळा ऋतू ला सुरुवात झाली तरी मात्र ताडी विक्री सुरूच आहे, एवढेच नाहीं तर विक्रेता शासकीय इमारतीत म्हणजेच बसस्थानकातच आपला डेरा मांडून खुलेआम ताडी विकताना दिसत आहे.
ताडाच्या झाडापासून निघणारा ताडी अर्क आटून गेला मात्र यांच्या डबक्यात ताडी आपोआप तयार होत असते. याचे कारण ताडी ही रासायनिक पावडर किंवा इतर द्रवापासून तयार केली जातं असावी.
ताडी पिणाऱ्याची संख्या कितीही वाढली तरी मात्र विक्रेत्याची ताडी कधीच संपत नाहीं. जणू ह्या लोकांना ताडीचा झरा सापडला असावा. याच बसस्थानकात लहान मुले मोठ्या व्यक्तीला ताडी पिताना बघून ताडी पिऊ लागले व एकदा ताडीची सवय लागली की काही मुलांना दारू ची पण लत लागू शकते. त्यामुळे असं खुलेआम निर्भीड होऊन ताडी विकणे किती धोक्याचे आहे हे स्पष्ट दिसूण येते.
सदर ताडी विक्रेता बाहेर राज्यातून आपल्या गावात येऊन ताडी विक्री करत आहे आणि गावात अश्याप्रकारे निर्भीड होऊन ताडी विकत असतो, हे पाहून विक्रेता हा ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाच्या छत्रछायेखाली अवैध नशिली ताडी विकत तर नसावा किंवा काही लोक ताडी विक्री विरोधात बोलल्यानंतर ताडी विक्री दोन तीन दिवस बंद राहते व परत विक्री सुरु होते तर यांच्या मागे कोण असावा असा प्रश्न गावकऱ्यांना पडू लागला आहे व गावातून ताडी व दारू विक्री कायम बंद व्हावी अशी मागणी गावकरी स्थानिक प्रशासनाला करू लागले आहे.