जिल्हा सामान्य रुग्णालयातील ‘त्या’ नेत्रचिकीत्सकास त्वरित हटवा,अनुप मेश्राम यांची मागणी..
मुख्य संपादक

गडचिरोली येथील जिला सामान्य रुग्णालयात नेत्रचिकीत्सक या पदावर कार्यरत असलेले राजेश मनोहर बत्तुलवार ग्रामीण रुग्णालय धानोरा येते कार्यरत असताना सुध्दा काही राजकीय पुढा-यांच्या आशिर्वादाने डेपोटेशन घेऊन गेली ७ ते ८ महिन्यापासून गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात
नेत्रचिकित्सक म्हणून कार्यरत आहेत.
राजेश मनोहर बतुलवार हे स्वतःला डॉक्टर समजून नेत्र विभागात स्वत:ला सर्जन असल्याचा आव आणून तपासणीसाठी आलेल्या रुग्णांची थातूरमातूर तपासणी करणे व रुग्णांना चूकीचे मार्गदर्शन करून तुम्ही एक महिन्यांनी या, दोन महिन्यांनी या असे सांगून रुग्णांची सतत दिशाभूल करीत असतात. त्याच्या या निर्दय व बेशिस्त वागण्यामुळे जिल्हयातील दुर्गम, अतिदुर्गम ग्रामीण व शहरी भागातील रुग्ण शस्त्रकियेपासून वंचित असून शस्त्रकियेसाठी आलेल्या रुग्णांना मानसिक व आर्थिक त्रास देण्याचे काम करीत असतात.
राजेश मनोहर बतुलवार यांचे चंद्रपूर रोडवर स्वतःचे घर असून स्वतःच्या घरात त्यांनी आर्या नावाचे चष्माघर सुरु केलेले असून या चष्माघराला कुठलीही शासकीय मान्यता नसतांना नेत्र तपासणीसाठी व नेत्र शस्त्रक्रियेसाठी आलेल्या रुग्णांना स्वतःच्या चष्माघरी बोलावून व रुग्णांची चष्मे स्वतः बनवून देतात.दुर्गम भागातील गरीब, निराधार रुग्णाची फसगत व लुबाडणूक करीत असतात.
मनोहर बत्तुलवार यांची जिल्हा सामान्य रुग्णालयातील नेत्र विभागात हुकुमशाही शिगेला पोहचलेली असून रुग्णालयात नेत्र तपासणी व शस्त्रकीयेसाठी आलेल्या रुग्णांना अतीशय त्रासदायक ठरत आहे.राजेश मनोहर बत्तुलवार यांची जिल्हा सामान्य रुणालयातून त्वरीत हकालपटटी करण्यात यावी व शासकीय सेवेत असलेल्या राजेश मनोहर बत्तुलवार यांच्या घरी असलेल्या आर्या नावाचे चष्माघराची जातीने चौकशी करून चष्माघर सिलबंद करण्यात यावे अशी मागणी अनुप मेश्राम यांनी जिल्हाधिकार्यालयाला दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.