Breaking
क्राईमदेश-विदेश

कलकता येथील मेडिकल काँलेजमघ्ये काम करणाऱ्या 31 वर्षीय डॉक्टर मुलीवर बलात्कार करुन केली हत्या ।

मुख्य संपादक

 

 

कलकता येथील मेडिकल काँलेजमघ्ये काम करणाऱ्या 31 वर्षीय डॉक्टर मुलीवर बलात्कार करुन केली हत्या ।

 

दणका कायद्याचा डिजिटल न्युज .

कलकत्ता .

स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा! एका ३१ वर्षीय डॉक्टर मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली आहे.

 

 

 

 

 

कोलकाता येथील मेडिकल कॉलेजमध्ये ३६ तास काम करून ती असेम्ब्ली हॉल मध्ये शेवटची पहाटे ३ वाजता इतरांना भेटली.

सगळं काही नॉर्मल होतं आणि सकाळी ती मेलेली, अर्धवट कपड्यात, तुकड्यात भेटली! ना अनोळखी ठिकाणी, ना कोणत्या रस्त्यावर… हॉस्पिटल परिसरात कामावर असताना ही घटना घडलीय!
तिने शॉर्ट कपडे नव्हते घातले, मांड्या उघड्या नव्हत्या की स्लीवलेस नव्हती! तथाकथित वासना जागृत होईल असं तिचं वागणं किंवा कपडे नव्हते. आपलं काम करून थकून झोपायला निघाली होती ती डॉक्टर. आज ज्याला वंदन करतोय त्या आपल्या तिरंग्यातील एक रंग… शुभ्र पांढरा एप्रॉन होता तिच्या अंगावर! कोणीतरी बलात्कार करून मारुन टाकलं तिला! बलात्कार हा कधीच एका व्यक्तीच्या शरीरासोबत होत नसतो… तो होतो माणुसकीसोबत, त्या व्यवस्थेसोबत! MBBS आणि इतर शाखेत नवीन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे…‌ आता बापांनी काय म्हणून आपल्या मुलींना वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश द्यावा? परवा जे तिथं घडलं उद्या आपल्या मुलीसोबत का घडणार नाही…‌? आहे का सुरक्षा?

बाहेरच्या राज्यातलं सोडा , आज महाराष्ट्रात कितीतरी मेडिकल कॉलेज परिसरात अगदी अशीच परिस्थिती आहे. हॉस्पिटल आणि मुलींचं हॉस्टेल अर्धा-एक किलोमीटर अंतर असतं, झाडं -झुडपं असतात, लाईट नसते, CCTV नसतात, सुरक्षा रक्षक नसतात. दोन वर्षांपूर्वी यवतमाळमध्ये असंच एका डॉक्टरला मारलं होतं!
JR म्हणजे ज्युनिअर रेसिडेंट, निवासी डॉक्टरांचं आयुष्य कधी एखाद्यानं जवळून बघावं… तुम्ही म्हणाल हमाली केलेली परवडली! दहा दहा दिवस अंघोळ नसते… मानसिक ताण वेगळाच! सरकारी दवाखान्यातील मोठ्या पगारावरचे मजूर असतात हे JR… ती पण अशीच होती!
अशा अवस्थेमध्ये कोणीतरी एक व्यक्ती बाहेरून येतो… बलात्कार करतो, मारून टाकतो!
या प्रकरणातील सर्वात वाईट भाग म्हणजे हॉस्पिटल प्रशासनाने सांगितलं की, तिने आत्महत्या केली! आई वडिलांना तीन तास तिला बघून दिलं जात‌ नाही. नंतर लोकांचा दबाव निर्माण होतो, नंतर पोस्ट मॉर्टम रिपोर्ट सांगतो की हा बलात्कार आणि हत्या आहे! प्रकरण पूर्णपणे दडपण्याचा प्रयत्न होतो. ही आपली व्यवस्था…?
खरंतर ज्या पद्धतीने घटना घडल्या ते पाहता ते कोणा एका व्यक्तीचं काम वाटत नाही, तिचा गळा दाबलेला आहे, पाय तोडले आहेत, बलात्कार केला आहे (१५० Mg Semen Swab मिळाला आहे जो एका व्यक्तीचा असूच शकत नाही), तिच्या डोक्याला मार आहे, डोळ्यातून आणि नाकातून रक्त आलं होतं. हाडं तुटली आहेत, तिनं आवाज करू नये म्हणून तोंड भिंतीवर किंवा जमिनीवर दाबलं गेलेलं आहे. गोष्ट दिसतेय तेवढी सोपी नाही. एका माणसाचं हे काम नाही… एकापेक्षा अधिक लोकांनी केलेला हा भयंकर गुन्हा आहे!
पहाटे तीन पर्यंत तिनं दवाखान्यात काम केलं आणि मेली बस्स एवढीच तिची कहाणी!
ती मेलीय ..‌. आता तिला न्याय मिळणं हे फक्त तिच्या कुटुंबीयांच्या, आपल्या समाधानासाठी!
पुन्हा अशी घटना घडू नये एवढीच प्रार्थना!
आपली व्यवस्था फार वाईट आहे… गुडघ्याला लागलं की आपण अंगठ्याचं दुखणं विसरतो. उद्या नवीन काहीतरी टास्क येईल आणि आपण त्या डॉक्टरला विसरून जाऊ… जोपर्यंत पुढील बलात्कार होत नाही तोपर्यंत!
स्वातंत्र्यदिनाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा!

डॉ. प्रकाश कोयाडे
Prakash Koyade

😥😥😥

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे