संविधान सन्मान महासभेकरीता ,आज गडचिरोली मधुन वंचितचे हजारो कार्यकर्ते मुंबईला रवाना
मुख्य संपादक
संविधान सन्मान महासभेकरीता – आज गडचिरोली जिल्ह्यातील वंचितचे हजारो कार्यकर्ते मुंबईला रवाना
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
मुख्य संपादक
गडचिरोली . दि. 24/ 11/ 2023.
वंचित बहुजन आघाडीच्या वतिने उद्या २५ नोव्हेंबर रोजी संविधान दिनाच्या पार्श्वभूमिवर “संविधान सन्मान महासभेचे” आयोजन मुंबईतील छत्रपती शिवाजी पार्कवर करण्यात आले आहे. या सभेकरीता गडचिरोली जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते जिव्हाध्यक्ष बाळू टेंभुुर्णे यांच्या नेतृत्वात गडचिरोली एसटी आगारातील स्पेशल बसने रवाना झाले आहेत.
लोकांच्या संविधानाने या देशातील शोषीत, वंचित , अल्पसंख्यांक, दलित-आदिवासी, ओबीसी व धार्मिक समुह या सर्वांच्या हक्क अधिकारांचे संरक्षण केले आहे, समता, बंधूता आणि न्यायाची हमी दिली आहे, २५ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेत डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान समितीच्या वतिने संविधान सादर केले, संविधान व येणारी परिस्थीती आणि त्यावरील उपाय यावर उहापोह करणारे भाषण केले. त्या भाषणाचे ऐतिहासीक महत्व लक्षात घेऊन या संविधान सन्मान महासभेचे आयोजन करण्यात आले आहे.
या ऐतिहासीक संविधान सन्मान महासभेला जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने गडचिरोली येथील एसटी बसस्थानकातील स्पेशल एसटी बसने रवाना झाले आहेत. नागपूर येथून विदर्भ एक्सप्रेसने मुंबईला सकाळी पोहचतील. जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे, महासचिव योगेंद्र बांगरे, जेष्ठ नेते सिताराम टेंभुर्णे, महासचिव मंगलदास चापले, संघटक भिमराव शेंडे, महिला जिल्हाध्यक्षा प्रज्ञा निमगडे, युवक आघाडी महासचिव धनंजय शेंडे, उपाध्यक्ष कवडू दुधे, तालुकाध्यक्ष बाशिद शेख, विलास केळझरकर, कृष्णा रोहनकर, सुधाराम सहारे, पुणेश्वर वालदे, राजेंद्र गेडाम, जासू सहारे, एड.अनंत उंदिरवाडे, शहराध्यक्ष दिलीप बांबोळे, युवक शहराध्यक्ष पिंटू मेश्राम, महासचिव मेहबूब मलिक, संघटक विपीन सूर्यवंशी, अश्विनी जांभूळकर, मंदा तुरे, मनिषा वानखेडे, शोभाताई शेरकी, शकु़तला दुधे आदिंसहीत हजारो कार्यकर्ते रवाना झाले.