
राष्ट्रीय मानवाधिकार दिनानिमित्त राष्ट्रीय मानवाधिकार संगठन (एसो) दिल्ली तर्फे गडचिरोली जिल्ह्यातील सामाजिक, प्रशासकीय, राजकीय व पत्रकारीतेतील आदर्श मान्यवरांचा सत्कार मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते संपन्न.
दणका कायद्याचा डिजिटल न्युज .
गडचिरोली .
दि.10 /12/2023.
आज दि .१० डिसेंबर राष्ट्रीय मानवाधिकार दिवसाचे औचित्य साधून राष्ट्रीय मानवाधिकार संगठन (एसो) दिल्ली यांच्या तर्फे गडचिरोली जिल्ह्यातील पद्मश्री पुरस्कार प्राप्त डॉ.परशुराम खुणे व सामजिक, प्रशासकीय, राजकीय व पत्रकारितेतील आदर्श मान्यवरांचा मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम गोंडवाना कलादालन सभागृह येथे पार पडला यावेळी मा .ना .अशोकजी नेते,खासदार,गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्र, मा.ना. डॉ. देवरावजी होळी, आमदार,गडचिरोली विधानसभा क्षेत्र, मा.ना. कृष्णाजी गजभे, आमदार,आरमोरी विधानसभा क्षेत्र, मा.प्रशांतजी वाघरे,जिल्हाध्यक्ष भाजपा, मा. दिपकदादा आत्राम,माजी आमदार,अहेरी विधानसभाक्षेत्र, मा. तनुश्रीताई आत्राम,सिनेट सदस्य, मा. नानाभाऊ नाकाडे,माजी कृषी सभापती, सत्कारमूर्ती मा.डॉ. परशुराम खुणे, पद्मश्री पुरस्कार प्राप्त, मा. लीलाधरजी भरडकर मा.महेशजी पटेल ,राष्ट्रीय अध्यक्ष,राष्ट्रीय मानवाधिकार संगठन (एसो) दिल्ली व इतर मान्यवर उपस्थित होते.
भारतातील सर्व नागरिकांना स्वातंत्र्य,समानतेचा अधिकार ५० वर्षापूर्वी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाने दिले. आणि या संविधानाला कुणीही बाधा पोहचवू शकत नाही असे मा.ना.राजे धर्मरावबाबा आत्राम यांनी सांगितले. तसेच गडचिरोली हा आदिवासी बहुल,वन संपन्नतेने तसाच खनिज संपन्नतेने वेढलेला जिल्हा आहे या पासून रोजगार निर्मिती साठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. जिल्ह्यात रेल्वे लोहमार्ग ,रस्ते व महामार्ग,तसेच विमान सेवा शासन लवकरात लवकर सुरु करण्याचे शासनाचे मानस आहे. जिल्ह्यात दळण-वळणाची उत्तम सोय व्हावी तसेच जिल्हा प्रगतीच्या मार्गाने मार्गक्रमन करत आहे असे मा.ना. अशोकजी नेते,खासदार यांनी सांगितले .
हा कार्यक्रम पूर्णत्वासाठी श्री.प्रणयजी खुणे,प्रदेशअध्यक्ष,राष्ट्रीय मानवाधिकार संगठन (एसो) दिल्ली यांचे खूप मोठे योगदान होते. तसेच या कार्यक्रमासाठी जावेद अली,विदर्भ अध्यक्ष, ज्ञानेद्रजी विश्वास,प्रवक्ता, शंकरजी ढोलगे,कार्याध्यक्ष, पायल कापसे, महिला विदर्भअध्यक्ष, तसेच जिल्हाध्यक्ष,तालुका अध्यक्ष व राष्ट्रीय मानवाधिकार संगठन (एसो) दिल्लीचे पदाधिकारी यांच्या परिश्रमाने हा कार्यक्रम संपन्न झाला.