
भरधाव दुचाकीची समोरून येणाऱ्या मालवाहू ट्रकवर जबर धडक बसून झालेल्या अपघातात तिघेजण तरुण जागीच ठार.
दणका कायद्याचा डिजिटल न्यूज
गडचिरोली, दि.10 : भरधाव दुचाकीची समोरून येणाऱ्या मालवाहू ट्रकवर जबर धडक बसून झालेल्या अपघातात तिघेजण तरुण जागीच ठार झाल्याची घटना 9 जानेवारी रोजी रात्रो साडेनऊ वाजताच्या सुमारास चंद्रपूर मार्गावरील मुरखळा गावानजीक घडली. अक्षय दसरथ पेंदाम (23), अजित रघू सडमेक (23), अमोल अशोक अर्का (20, सर्व रा. गोविंदगाव ता.अहेरी अशी मृत तरुणांची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार, मृतक तिघेही हे रात्रोच्या सुमारास नव्या दुचाकीने गडचिरोली कडे येत होते. दरम्यान मुरखळा नजीकच्या वळणावर समोरून येत असलेल्या ट्रकवर दुचाकी धडकली. दुचाकी भरधाव असल्याचे बोलल्या जात असून ट्रकला धडक बसताच तिघेहीजण जागीच गतप्राण झाले. अपघात एवढा भीषण होता की दुचाकीचा चक्काचूर झाला. घटनेची माहिती होताच नागरिकांनी धाव घेतली होती व पोलीसा कळविले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणी करिता ताब्यात घेऊन नंतर नातेवाईकांच्या स्वाधीन केले. सदर घेटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेऊन पुढील कारवाई ची प्रक्रिया सुरु असल्याचे कळते.