
आणखी एका ट्रकने ,दुचाकीस्वारास केले ठार..
दणका कायद्याचा डिजिटल न्यूज
गडचिरोली :-
दिनांक 5/02/2024.
आरमोरी मार्गावरील काठाणीनदि पुलाजवळ ट्रकने दुचाकीस्वारस चिरडल्याची घटणा आज दि.सोमवार 5 फरवरी रोजी दुपारच्या 12 वाजताच्या सुमारास घडली . मारोती धोडुजी भोयर वय 50 वर्ष रा महादवादी असे अपघातात मुत्यु झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
तसेच मारोती भोयर हे शेती व दुघाचा व्यवसाय करतात आणि ते नित्याप्रमाणे गडचिरोली येथे दुध ग्राहकांना वाटप करूण एम.एच. 33 एए 3777 क्रमांकाच्या दुचाकिने स्वगावी परत येत होते दरम्यान काठाणीनदि काठी पूलानजदिक एम.एच.33 डब्ल्यू 2786क्रमांकाच्या मालवाहु ट्रक ने त्यांच्या दुचाकीस जब्बर धडक दिली .त्यानंतर ते मारोती भोयर हे खाली कोसळले व ट्रक चा चाक मारोती याच्या डोक्यावरुन गेल्याने जागिच त्याचा मुत्यु झाला .घटणेची माहिती मिळताच पोलीस घटणास्थळी दाखल झाले.अपघातानंतर ट्रक चालक फरार झाल्याचेकळते आहे .