
युवा जग्गजेत्या डी.गुकेशला शह देत आर प्रज्ञानंनदा झाला ‘ चँम्पीयन ‘..
दिनांक 03/02/2025.
दणका कायद्याचा डिजिटल न्युज .
मुंबई ,
नेदरलँड्समधील आन जी विक येथे रंगलेल्या टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञाननंदाने नुकताच विश्वविजेता ठरलेल्या डी. गुकेशला शह देत फायनल बाजी मारली आहे. अतिशय रोमहर्षक लढतीत ट्राय ब्रेकरनंतर २-१ अशी बाजी मारत आर. प्रज्ञाननंदाने टाटा स्टील या प्रतिष्ठित स्पर्धेचे जेतेपद पटकावले.
भारताचे पहिले ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद या दिग्गजानंतर ही स्पर्धा गाजवणारा प्रज्ञाननंदा हा दुसरा भारतीय ठरलाय. विशेष म्हणजे त्याने आपल्याच देशाच्या युवा विश्व विजेत्याला पराभूत करत ही स्पर्धा जिंकली आहे.